
पाचपिंपळा 33 केव्ही उपकेंद्रातील 10 MVA ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित.
- प्रतिनिधी : फारूक शेख :- माजी डॉ आरोग्यमंत्री तथा आमदार डॉ.तानाजीराव सावंत साहेब यांच्या विशेष प्रय त्नातून पाचपिंपळा येथील 33 केव्ही विद्युत उपकेंद्रासाठी 10 MVA क्षमतेचा एक व 5 MVA क्षमतेचा एक असे दोन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आले आहेत.
- यापैकी 10 MVA क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित कर ण्यात आल्याने पाचपिंपळा परिसरातील शेतकऱ्यांना मो ठा दिलासा मिळाला आहे.
- पाचपिंपळा येथील उपकेंद्रावर यापूर्वी 5 MVA क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर कार्यरत होता.

- परिसरातील वाढती वीज मागणी आणि शेतीपंपांचा वाढ ता भार यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, कमी दा बाने वीज मिळणे तसेच शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री वीज उपलब्ध करून देण्याची वेळ येणे, अशा समस्यांना शेतक ऱ्यांना सामोरे जावे लागत होते.
- ही समस्या लक्षात घेऊन दिनकर खैरे, नारायण खैरे व ध नाजी खैरे यांनी आमदार डॉ.तानाजीराव सावंत यांच्या कडे सातत्याने पाठपुरावा केला.
- पाचपिंपळा उपकेंद्राची क्षमता वाढवून परिसरातील शेत कऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा, अशी मागणी त्यांनी केली होती.
- त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची आमदार डॉ.सावंत यांनी दखल घेत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून 10 MVA व 5 MVA असे दोन ट्रान्सफॉर्मर मंजूर करून घेतले.
- या कामासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उ पकार्यकारी अभियंता श्री. सुनील पवार यांचे मोलाचे सह कार्य लाभले.
- त्यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही पूर्ण करून 10 MVA क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित केला.
- 10 MVA ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाल्यामुळे पाचपिंप ळा, कुंबेफळ, राजुरी, जाके-पिंपरी, पिंपरखेड, साकत आणि अंधोरी आदी गावांतील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
- वीजपुरवठ्यावरील ताण कमी होऊन विद्युत पुरवठा अधि क सुरळीत व स्थिर होण्यास मदत होणार आहे.
- ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाल्याने परिसरातील शेतकऱ्यां मध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
- अनेक दिवसांपासून भेडसावत असलेल्या वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पा ऊल मानले जात आहे.
- आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या प्रयत्नांना आणि दिनकर खैरे, नारायण खैरे व धनाजी खैरे यांच्या सातत्यपू र्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाल्याची भावना ग्रामस्थां नी व्यक्त केली.
- यावेळी महावितरणचे लाईन स्टाफ तसेच पाचपिंपळा सब स्टेशनचे ऑपरेटर उपस्थित होते. तसेच उत्तम खैरे, नाराय ण खैरे, धनाजी खैरे, दत्तू मेंढे, हनुमंत खैरे, माऊली गोडगे, युवराज खैरे, किरण खैरे, भगवान खैरे, इमरान बागवान, नागनाथ खैरे, सचिन राऊत, श्रीमंत खैरे,राजाराम पाटील, मिटू गोडगे, चंदू लटके ,पिंटू काळे, हनुमंत नामदेव खैरे, बापूसाहेब खैरे, सचिन बारस्कर, सुग्रीव खैरे, विनोद नाई कोडे, गणेश महारुद्र खैरे, गोकूळ बाबूराव खैरे,MSEBचे लाईनमन राहुल बनसोडे,बालाजी चौधरी,ऑपरेटर दिनेश सांगडे, बालाजी साबळे . यांच्यासह पाचपिंपळा, कुंबेफ ळ, जाकेपिंपरी, राजूरी,अंधोरी आदी गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






