अरांक्षा यादव रत्नागिरीच्या नव्या उपविभागीय पोलिस अधिकारी.

  • प्रतिनीधी : रत्नागिरी : नितीन राणे :- रत्नागिरीचे उप विभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर यांची पाल घर येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी २०२३ बॅचच्या आयपीएस अधिकारी अरांक्षा यादव यांची नियुक्ती कर ण्यात आली आहे.
  • राज्यातील आठ परिविक्षाधीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेचे आदेश मंगळवारी (दि. २५) गृह विभागाक डून जारी करण्यात आले असून, त्यामध्ये अरांक्षा यादव यांचा समावेश आहे.
  • अरांक्षा यादव यांनी यापूर्वी कोल्हापूर येथे अतिरिक्त पोलि स अधीक्षक म्हणून काम केले आहे.
  • आता त्यांच्याकडे रत्नागिरी उपविभागाची महत्त्वपूर्ण ज बाबदारी सोपविण्यात आली आहे. कोल्हापूर येथे कार्यरत असताना त्यांनी अंमली पदार्थांविरोधातील कारवाईला गती देण्यावर विशेष भर दिला होता.
  • रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईन कर यांची काही दिवसांपूर्वी पालघर येथे जातपडताळणी विभागाचे डीवायएसपी म्हणून बदली झाली होती.
  • मात्र,त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती न झाल्या ने माईनकर हेच काही काळ पदाचा कार्यभार सांभाळत होते. आता अरांक्षा यादव यांच्या नियुक्तीमुळे रत्नागिरी उपविभागाला नवे नेतृत्व मिळाले आहे.
  • अरांक्षा यादव या २०२३ बॅचच्या आयपीएस अधिकारी असून, त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२२ मध्ये देशात २०२ वा क्रमांक पटकावला होता.
  • मूळच्या हरियाणाच्या असलेल्या यादव यांचे शिक्षण दि ल्लीतील प्रतिष्ठित सेंट स्टीफन्स कॉलेज तसेच जवाहरला ल नेहरू विद्यापीठातून झाले आहे.
  • सुरुवातीला त्यांना गुजरात कॅडर मिळाले होते. मात्र, २० २१ बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी अनमोल मित्तल यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांची महाराष्ट्र कॅडरमध्ये बदली करण्यात आली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles