संतपीठाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गाडगे यांचा ‘गुरुजन गौरव पुरस्कार’ देऊन कार्यगौरव.

  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर : आळंदी :-बदलत्या तंत्रज्ञाना च्या काळात विद्यार्थ्यांना केवळ माहिती देणे पुरेसे नाही. त्यांच्यामध्ये विवेक,संवेदनशीलता आणि सामाजिक जबा बदारीची जाणीव निर्माण करणे ही शिक्षकांची खरी भूमि का आहे.
  • शिक्षणातून माणूस घडला, तरच समाजाचे भविष्य उज्ज्व ल होईल, असे प्रतिपादन विश्वपुण्यधामपीठ–कैकाडी म हाराज मठाचे महंत ह.भ.प. भारत महाराज जाधव यांनी केले.
  • वृंदावन फाऊंडेशन, पुणे यांच्या वतीने आयोजित २१ व्या ‘गुरुजन गौरव सोहळ्या’त ते बोलत होते.
  • संत चोखामेळा आरोग्य केंद्र, आळंदी येथे झालेल्या या सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने कार्य कर णाऱ्या उपक्रमशील, प्रयोगशील आणि समर्पित मुख्याध्या पक व शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
  • “शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ परीक्षार्थी न बनवता जीव नातील प्रश्न समजून घेणारे विवेकी नागरिक म्हणून घडवावे.
  • ज्ञानाला संस्कारांची,तर शिक्षणाला मानवतेची जोड मिळा ली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनगंड दूर करून त्यां च्यात आत्मविश्वास निर्माण करणारा शिक्षकच खऱ्या अ र्थाने राष्ट्रनिर्माता असतो,” असे भारत महाराज यांनी सांगितले.
  • कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल माध्यमांमुळे ज्ञान सहज उपलब्ध झाले असले, तरी योग्य-अयोग्याचा निर्णय घेण्या ची क्षमता शिक्षकच विकसित करू शकतात.
  • त्यामुळे आधुनिक साधनांचा स्वीकार करताना शिक्षणाती ल मानवी संवाद, मूल्यशिक्षण आणि सामाजिक भान जप णे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
  • फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष सचिन पाटील म्हणाले, “शिक्षकांचा सन्मान म्हणजे केवळ एका व्यक्तीचा नव्हे,तर ज्ञाननिष्ठेचा आणि समाजाच्या भविष्याचा सन्मान आहे.
  • ग्रामीण आणि शहरी भागांतील अनेक शिक्षक उपलब्ध साधनांच्या मर्यादा ओलांडून कल्पक उपक्रम राबवत आहेत.
  • अशा शिक्षकांचे कार्य समाजासमोर आणणे आणि त्यां च्या पाठीशी कृतज्ञतेने उभे राहणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.”
  • या सोहळ्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शिक्षण क्षेत्रा त उल्लेखनीय कार्य करणारे प्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर गाडगे, प्रा चार्य डॉ.प्रदीप कदम, अनंत सूर्यवंशी, शिवचल कुमार सा लीमर, सतीश होनराव, मंजुश्री शिंदे, प्रा.संदीपान जगदा ळे, वर्षा यादव, मिता तांबे, शरणगौडा पाटील, आकांक्षा पाताडे आणि मयूर स्वामी यांचा गौरव करण्यात आला.
  • शिक्षकांनी वर्गातील अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सं विधानिक मूल्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरणविषयक जा णीव आणि सहजीवनाची भावना रुजवावी, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली.
  • सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गपाट, ह.भ.प. बाबूराव तांदळे महाराज, प्रा. श्रीधर कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, पालक आणि वि द्यार्थी यावेळी उपस्थित होते.
  • कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष यादव यांनी केले. सूत्रसं चालन अविनाश अभंगराव यांनी केले, तर डॉ.विजय महा जन यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परमेश्वर चव्हाण, सुनील काकडे आणि शुभम पाटील यांनी परिश्रम घेतले.
  • वृंदावन फाऊंडेशनच्या वतीने गेल्या २१ वर्षांपासून ‘गुरु जन गौरव सोहळ्या’चे आयोजन करण्यात येत आहे.
  • शिक्षकांच्या प्रयोगशील कार्याची दखल घेऊन त्यांच्या यो गदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles