खार येथील जनसेवा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळा तर्फे भव्य नवरात्र महोत्सवाचे आयोजन.

  • प्रतिनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :- ‘नवसाला पावणारी खार मुंबईची जगदंबा’ अशी ख्याती असलेल्या खार (पूर्व) येथील जनसेवा सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ (रजि.) या मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भव्य नव रात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • जगदंबा मातेचे पारंपारिक भव्य आगमन रविवारी दुपारी ठीक ३ वा होणार आहे.
  • दि ११ ऑक्टो २०२६ (घटस्थापना) ते २० ऑक्टो. २०२६ (विजयादशमी) या कालावधीत मंडळातर्फे “नवरात्र महो त्सव” साजरा करण्यात येतो.
  • मंडळ या वर्षी ४७ व्या वर्षात पदार्पण करत आहे, या वि भागात जागृत देवस्थान असून येथे धार्मिक पूजे अर्चेला भर दिला जातो.
  • देवी आपल्या मनोकामना पूर्ण करते असा विश्वास भक्त गणात असून विभाग व विभागाबाहेरील भक्तगण देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात व आपल्या मनातील सुखदुःखे देवीला सांगतात देवीही आपल्या भक्तांना निराश करत नाही असा देवी भक्तांना विश्वास आहे.
  • हा उत्सव स्थानिक रहिवाशी, देणगीदार, वर्गणीदार व हि तचिंतक यांच्या सहकार्याने साजरा करण्यात येतो.
  • धार्मिक, समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्याकडे जास्तीत जास्त मंडळाचा कल असतो.
  • नवरात्र उत्सवाच्या कालावधीत धार्मिक कार्यक्रमाबरोबर वैद्यकीय शिबीर, चित्रकला स्पर्धा, इतर सांस्कृतिक कार्य क्रम करण्यात येतात.
  • परंपरागत पद्धतीने चालत आलेल्या अंबेमातेच्या ८ व्या माळेला अष्टमीला दि. १८ ऑक्टो. २०२६ रोजी होम-हवन कार्यक्रमाला विभागातील भक्तगण व विभागाबाहेरील भा विक नवस करण्यासाठी किंवा पूर्ण झालेले नवस फेडण्या साठी आवर्जून उपस्थित राहतात तसेच महाभंडाऱ्याचा लाभ घेतात.
  • यंदाही मंडळाच्या वतीने नवरात्रौत्सव काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
  • तरीही देवी भक्तांनी या कार्यक्रमांना सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवा हन जनसेवा सार्वजनिक उत्सव मंडळ (रजि) मंडळाचे कार्याध्यक्ष शिवकुमार पडाच, अध्यक्ष – विनोद पवार, खजिनदार – गौतम खांबे आणि सचिव – अभिषेक कोलते यांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles