
पाचल-दिवाळवाडी येथील राधाकृष्ण नवरात्रोत्सव मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन…! १३ ऑक्टोबरला होणारा शक्तितुरा टिपरी नृत्याचा जंगी सामना ठरणार खास आकर्षण.
- प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील पाच ल दिवाळ वाडी येथील राधाकृष्ण नवरात्रोत्सव मंडळातर्फे यंदा नवरात्रो त्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
- ११ ते १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हा नवरात्रो त्सव उत्साहात साजरा होणार आहे.
- नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले.

- असून मंगळवार दि.१३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १० वा. राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध शक्तीवाली शाहीर कु ऐश्वर्या गोतावडे (महालक्ष्मी टिपरी नृत्य मंडळ ओणी गो तावडेवाडी) विरुद्ध तुरेवाली शाहीर कु. तन्वी करंबेळे (श्री सांबा कांडकरी टिपरी नृत्य कासारकोळवण (मावळत वाडी) ता. संगमेश्वर या दोन्ही तुल्यबळ शाहिरांत तुफान जुगलबंदी रंगणार आहे.
- तसेच विविध भजन कार्यक्रम, वारकरी भजन, कीर्तन तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना मिळणार आहे.
- गेल्या वर्षी मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवि ण्यात आले होते.
- यामध्ये आरोग्य तपासणी सेवा शिबिर, रक्तदान शिबिर,मो फत नेत्र तपासणी शिबिर, हळदीकुंकू समारंभ तसेच तिरं गी महिला भजनाचे आयोजन करण्यात आले.
- या उपक्रमांना परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यंदाच्या उत्सवातील विशेष आकर्षण म्ह णून फॅन्सी ड्रेस स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ आयोजि त करण्यात आला आहे.
- तसेच श्री सत्यनारायण महापूजा व विविध भजन मंडळां चे कार्यक्रमही होणार आहेत.
- नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरेसोबतच सा माजिक बांधिलकी, महिला सहभाग, आरोग्य जनजागृती आणि सांस्कृतिक जतनाचा संदेश देण्याचा प्रयत्न मंडळा च्या माध्यमातून करण्यात येत आहे.
- परिसरातील नागरिकांनी नवरात्रोत्सवातील सर्व कार्यक्र मांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाची शोभा वा ढवावी, असे आवाहन राधाकृष्ण नवरात्रोत्सव मंडळ, पाच ल-दिवाळवाडी यांच्याकडून करण्यात आले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






