मराठवाडा पदवीधर निवडणूक: मविआचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्याकडून इटकुर येथे मतदानाचा हक्क बजावला; विजयाचा ठाम विश्वास.

  • पतिनिधी : परंडा : फारूक शेख :-मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी इटकुर (ता. कळंब) येथील मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावला.
  • मतदान प्रक्रियेत सहभाग घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्य मांशी संवाद साधताना आपला विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.
  • तसेच संपूर्ण मतदारसंघातील मतदार आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
  • मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आ ज उत्साही वातावरणात मतदान पार पडत आहे.
  • निवडणूक रिंगणातील महाविकास आघाडीचे प्रमुख उमेद वार डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी आपल्या मूळ गावी, इटकु र येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
  • प्रचारादरम्यान डॉ. पाटील यांनी संपूर्ण मराठवाड्यात दौरा करून पदवीधरांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडली होती.
  • शिक्षण, वाढती बेरोजगारी, स्पर्धा परीक्षांचे रखडलेले नि काल, रखडलेली नोकरभरती आणि पदवीधरांचे इतर मा नधनाचे प्रश्न या मुद्द्यांवर त्यांनी आपल्या प्रचारात प्रामु ख्याने भर दिला होता.
  • पदवीधरांशी थेट साधलेला संवाद आणि त्यांच्या हक्कांसा ठी घेतलेली भूमिका यामुळे मतदारांचा आपल्याला उत्स्फू र्त प्रतिसाद लाभल्याचे डॉ.पाटील यांनी यावेळी सांगितले.
  • मतदान केल्यानंतर प्रतिक्रिया देताना डॉ.प्रतापसिंह पाटी ल म्हणाले, “या निवडणुकीत पदवीधरांनी अत्यंत विचार पूर्वक आणि उत्साहाने आपला कौल दिला आहे.
  • प्रचारादरम्यान मिळालेला प्रचंड पाठिंबा पाहता महाविका स आघाडीचा विजय निश्चित आहे. मी मतदारसंघातील सर्व पदवीधर मतदार आणि महाविकास आघाडीच्या घट क पक्षांतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानतो.”
  • दरम्यान, अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत महा युती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पाहाय ला मिळत आहे.
  • डॉ.पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आता मतपेटीतून पदवीधरांचा नेमका काय कौल बाहेर येणार, याकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles