
किल्ले रत्नदुर्गावर दसरा गडपूजन व शस्त्रपूजन सोहळा उत्साहात संपन्न. ‘आधी तोरण गडाला, मग घराला….!’ या संकल्पनेतून ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रेरणादायी उपक्रम.
- प्रतिनीधी : रत्नागिरी : प्रमोद तरळ :- गडकिल्ल्यांचे ऐ तिहासिक महत्त्व, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्र माचा वारसा आणि महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती जतन कर ण्याच्या उद्देशाने गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र रा ज्य – रत्नागिरी विभागाच्या वतीने दसऱ्यानिमित्त आयोजि त करण्यात आलेला गडपूजन व शस्त्रपूजन सोहळा कि ल्ले रत्नदुर्ग येथील महादरवाजा परिसरातील हनुमान मंदि र येथे उत्साहात आणि पारंपरिक दिमाखात संपन्न झाला.
- ‘आधी तोरण गडाला, मग घराला!’ या प्रेरणादायी संकल्प नेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला प्रति ष्ठानच्या मावळे व रणरागिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

- दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रथम गडाचे पूजन करून आप ल्या ऐतिहासिक वारशाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यानंतर घरात सण साजरा करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
- या सोहळ्याच्या निमित्ताने मावळे व रणरागिणींनी एकत्र येत किल्ले रत्नदुर्गाच्या महादरवाजा परिसराची स्वच्छता केला.
- ऐतिहासिक महादरवाजाला भव्य तोरण बांधून गडाला सणासुदीचे आणि मंगलमय स्वरूप प्राप्त करून देण्यात आले. पारंपरिक पद्धतीने गडपूजन व शस्त्रपूजन करून दसरा उत्सव साजरा करण्यात आला.
- या उपक्रमातून गड-किल्ल्यांचे संवर्धन, स्वच्छता आणि ऐ तिहासिक वास्तूंबद्दलची सामाजिक बांधिलकी अधोरेखि त करण्यात आली.
- या कार्यक्रमाला जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष ॲड. मांडवकर आणि त्यांचे सहकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
- या सोहळ्यात सहभागी होत उपक्रमाची शोभा वाढवली. मावळे व रणरागिणींच्या एकजुटीने आणि उत्साहपूर्ण सहभागाने संपूर्ण परिसरात शिवकालीन परंपरेची आणि ऐतिहासिक वारशाविषयीच्या अभिमानाची अनुभूती निर्माण झाली.
- गड-किल्ले हे केवळ ऐतिहासिक वास्तू नसून महाराष्ट्राच्या शौर्याचे, स्वाभिमानाचे आणि अस्मितेचे प्रतीक आहेत.
- या वास्तूंचे जतन करणे, त्यांची स्वच्छता राखणे आणि पु ढील पिढीपर्यंत त्यांचा इतिहास पोहोचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. याच विचारातून गडकिल्ले संवर्धन प्रति ष्ठान सातत्याने विविध संवर्धनात्मक आणि जनजागृतीपर उपक्रम राबवत आहे.
- दसऱ्यानिमित्त गडपूजन व शस्त्रपूजनाच्या माध्यमातून ऐ तिहासिक वारशाचे स्मरण करत, प्रत्यक्ष कृतीतून गडसंव र्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. ‘
- तोरण गडाला, मग घराला!’ या संकल्पनेतून गडांविषयीची निष्ठा, संस्कृतीचे जतन आणि संवर्धनाची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश या सोहळ्याने दिला.

- या ऐतिहासिक सोहळ्याला रणरागिणी समृद्धी चळके, पा लवी रसाळ, सनिका पांचाळ, तन्वी कळंबटे,रिया पांचाळ, साक्षी शिवलकर, अस्मिता पांचाळ,सलोनी सुर्वे, आकांक्षा पिलणकर,खुशी गोताड, रश्मी जाधव, वैष्णवी चव्हाण, शु भांगीनी जाधव, रुपाली गुरव तसेच मयूर भितळे, तन्मय जाधव,नयन कदम, प्रथमेश पांचाळ,सक्षम शिंदे, अथर्व पां चाळ,राज बंडबे, शशिकांत जाधव, रमाकांत आयरे, दिप क जाधव, रुपेश गुरव आदी मावळे उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






