
तस्करांना खाकीचा राहिला नाही धाक…! परंडा तालुक्यात मुजोर दारू तस्करांचा पोलिसांवरच हल्ला; जीवे मारण्याचा प्रयत्न.
- प्रतिनीधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यात अ वैध दारू वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा कमालीचा ऐरणीव र आला आहे.
- तालुक्यातील पांढरेवाडी परिसरात अवैध दारू वाहतुकी वर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरच त स्करांनी थेट हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
- कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- या थरारक घटनेमुळे तालुक्यात कायद्याची अंमलबजाव णी करणाऱ्या पोलिसांच्याच सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

- कारवाईसाठी गेलेल्या खाकीवरच थेट वार….?
- पांढरेवाडी परिसरात गोव्याहून आणलेल्या अवैध दारूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक व साठा केला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
- कारवाईसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर तस्करांनी टोळक्याने हल्ला केला.
- समाजात कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांवरच जर असे जीवघेणे हल्ले होणार असतील, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
- गोवा कनेक्शन: कठोर कारवाईची मागणी
- गोव्याहून छुप्या मार्गाने राजरोसपणे अवैध दारू आणणे, तिची वाहतूक करणे आणि परंडा तालुक्यासह ग्रामीण भा गात विक्री करणे,याचे एक मोठे जाळे निर्माण झाले आहे.
- या काळ्या व्यवसायामागे कोणती मोठी डोकी आहेत? या वाहतुकीसाठी कोणत्या वाहनांचा वापर केला जातो….? आणि या रॅकेटला कोणाचे आर्थिक व राजकीय पाठबळ लाभले आहे? या सर्व बाबींचा सखोल तपास होण्याची गरज निर्माण झाली आहे.
- सात जणांवर गुन्हा; संपूर्ण साखळी उद्ध्वस्त होणार का….?
- याप्रकरणी पोलिसांनी तातडीने पावले उचलत सात संश यित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- मात्र, केवळ गुन्हा दाखल करून पोलीस प्रशासन थांबणा र की या अवैध धंद्याचे मूळ शोधून काढणार, याकडे सर्वां चे लक्ष लागले आहे.
- मुख्य पुरवठादार कोण आहे, वाहतुकीच्या साखळीत आ णखी कोणाचा सहभाग आहे, याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
- पोलीस प्रशासनासमोर उपस्थित झालेले ५ थेट सवाल:
- परंडा तालुक्यात मूळ धरू पाहणाऱ्या अवैध दारू वाहतु कीला आळा घालण्यासाठी प्रशासन कोणती ठोस उपाय योजना करणार?
- कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर हल्ला करणाऱ्या या मु जोर प्रवृत्तींची निष्पक्ष व सखोल चौकशी होणार का?
- अवैध दारूचा मुख्य पुरवठा आणि वितरण करणाऱ्या सं पूर्ण आंतरराज्य साखळीपर्यंत पोलीस पोहोचू शकतील का?
- खाकीवर हात टाकून कायद्याला आव्हान देणाऱ्यांवर न्या यालयीन प्रक्रियेत कठोर शिक्षा होईल का…. ?
- भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि पोलिसांचे मनोधैर्य खचू नये यासाठी प्रशासन काय पावले उचलणार….?
- कायद्याचा धाक निर्माण करण्याची गरज….!
- या गंभीर घटनेची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने कोण त्याही दबावाला बळी न पडता निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी परंडा तालुक्यातील सुजाण नागरिकांमधून होत आहे.
- दोषींना कायद्याचा कडक इंगा दाखवून जेलची हवा दाख वणे गरजेचे आहे. कायद्याची अंमलबजावणी करताना पोलिसांच्या सुरक्षेची जबाबदारीही प्रशासनाने गांभीर्याने घ्यायला हवीं.
- या संपूर्ण प्रकरणात पोलीस प्रशासन तस्करांचा पर्दाफाश करून सर्वसामान्यांना न्याय देणार का, याकडे संपूर्ण तालु क्याचे लक्ष वेधले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






