राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेत मुंबई संघाची कांस्यपदकाला गवसणी.

  • प्रतिनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :- पश्चिम बंगाल येथे पा र पडलेल्या ३४ व्या सब-ज्युनियर राष्ट्रीय थ्रोबॉल अजिंक्य पद स्पर्धेत मुंबई संघाने उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्र मांक पटकावला असून कांस्यपदकावर आपले नाव कोर ले आहे.
  • या यशामुळे मुंबईच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
  • या स्पर्धेत मुंबईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कादंबरी काळे, किया खान, याना पुरोहित आणि विहान निळे या खेळाडूं नी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाच्या यशात मोलाचे योगदान दिले.
  • विशेष म्हणजे, हे चारही खेळाडू रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅ शनल स्कूल, विरार येथील विद्यार्थी असून त्यांच्या या राष्ट्री य स्तरावरील यशामुळे शाळेच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला गेला आहे.
  • खेळाडूंची जिद्द, मेहनत, शिस्त, सांघिक भावना आणि उ त्कृष्ट खेळाचे कौशल्य यामुळे मुंबई संघाला हे यश संपादन करता आले.
  • तसेच प्रशिक्षक मयुरेश कमलाकर वालम यांनी खेळाडूंना दिलेले योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि खेळाडू घडविण्यासाठी घेतलेले परिश्रम या यशासाठी महत्त्वपूर्ण ठरले.
  • या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाचे क्रीडाप्रेमी, पालकवर्ग तसेच विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
  • राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश निश्चितच उदयोन्मुख खे ळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. भविष्यात हे गुणवान खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या खेळाचा ठसा उमटवती ल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
  • मुंबई संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक मयुरेश वालम आ णि रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, विरार यांचे या दै दिप्यमान यशाबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles