शाहीर विकास लांबोरे यांच्या अविश्वसनीय प्रवासाची कहाणी अडीच वर्षांत गायली ५१ हून अधिक ग्रामदैवतांची गीते.

  • प्रतिनीधी : लांजा : प्रमोद तरळ :-कोकणातील ग्रामदैव तांची महंती आपल्या गीतांमधून गाणारे शाहीर गीतकार विकास लांबोरे यांच्या संगीत प्रवासाचे सर्वत्र कौतुक होत असून श्री देव रवळनाथ, महामाया आणि धारोजी आदी देवांचा महिमा गाणारे गीत गाऊन तिवरे गावातील ग्रामदै वतांचा सांस्कृतिक वारसा वृध्दिंगत केल्याने कोकणची लोककला मित्र परिवार यांच्या वतीने श्री प्रथमेश दैत यां नी त्यांचे अभिनंदन केले आहे.
  • सन २०२४ ची गोष्ट. पुण्यात MPSC ची तयारी करत होतो. विनायक पातेरे मला रोज भेटायला यायचे. रोज सोबत चहा व्हायचा. गप्पा व्हायच्या. त्यांची, सतीशभाऊ डाकवे आणि पांडुरंग पाणकर यांची काही चर्चा झाली होती.
  • त्यांनी मला वेरळ गावचं ग्रामदैवत धनी रवळनाथ यांचं गा णं करण्याची ईच्छा व्यक्त केली. ते गाणं माझं पहिलं ग्राम दैवत गीत. त्यानंतर आसगे गावाचे ग्रामदैवत इटलादेवीचं नवीन मंदिर बांधून तयार होतं.
  • त्या मंदिराचे वर्धापन गीत करण्याची संधी आली आणि तिथपासून गेल्या अडीच वर्षात तब्बल ५१ हून अधिक गावांची गाणी करण्याची मला आणि माझ्या टीमला संधी मिळाली.
  • वेगवेगळी गाणी, सर्वच्या सर्व वेगळ्या चाली करून हा प्रवास करणं कठीण होतं. त्या त्या ग्रामदैवतांनी त्यांचं त्यांचं गाणं आमच्याकडून करून घेतलं आणि हा टप्पा गाठता आला.
  • असे शाहीर विकास लांबोरे यांनी आपल्या प्रवासाची क हाणी उलगडली अडीच वर्षांनंतर जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा अनेक गोष्टींचे अप्रूप वाटते.
  • तिथल्या रूढी, तिथल्या पूर्वजाने जे काही पेरून ठेवलंय ते जपून ठेवणारी आताची पिढी, तिथले बारकावे आणि या सगळ्यांचे निरीक्षण केल्यावर थक्क व्हायला होतं. आणखी खोलवर जाऊन अभ्यास करावा वाटतो. अर्थात ते प्रचंड आव्हानात्मक आहे.
  • संदीप पालेकर सरांसारखे संगीतकार सोबत नसते तर हे कधीच शक्य नव्हतं. गायिका तृप्ती जाधव ही प्रचंड मेहन ती मुलगी आहे.
  • तिचं तिच्या कामावर प्रचंड प्रेम आहे. तिने यातील ४० हुन अधिक गाणी सोबत गायली आहेत.
  • स्टुडिओची कामे करताना आनंद असतोच मात्र गावदेवां ची गाणी करताना ज्या काही vibes असतात त्या शब्दांत व्यक्त करता येत नाहीत.
  • त्याची फक्त अनुभूती घेता येते. हे गाणं करणे म्हणजे मी केवळ एक कलाकृती समजत नाही तर त्या गावदेवाची खण नारळाने ओटी भरल्याची भावना तयार होते.
  • अनेक ग्रामदैवतांचे आशीर्वाद लाभलेत. आणखी मिळावे त कोकणातील ग्रामदैवतांचा अनमोल ठेवा माझ्या गीतातू न जपला जावा दैवतांची महती पुढील पिढीला माहिती व्हावी आणि हे सत्कार्य माझ्या लेखणीतून घडत आहे याकरिता मी स्वतः नशीबवान आहे.
  • गावातील ग्रामदैवतांचा इतिहास शब्दबद्ध करण्यासाठी आमची टीम प्रयत्न करीत राहील असे सांगत श्री लांबोरे यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles