जीर्ण विज खांब,लोंबकळणाऱ्या तारा कुरंग बांधवाडीत वीजवाहिन्यांपासून ग्रामस्थांना धोका.

  • प्रतिनीधी : लांजा : प्रमोद तरळ :- तालुक्यातील कुरंग या गावी घराशेजारी विजेचे पोल सडले गेले आहेत आणि त्यातच पोल वरील विजेच्या तारा खाली लोंबकळणाऱ्या अवस्थेमध्ये दिसत आहेत.
  • वेळोवेळी विद्युत महामंडळाला कळवून सुद्धा लक्ष दिला जात नसल्याने युवा नेतृत्व सचिन बेर्डे यांनी प्रत्यक्ष महावि तरण भांबेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व स विस्तर चर्चा केली तरी अजून परिस्थिती आहे तशीच आहे.
  • एकंदरीत परिस्थिती आणि दुरवस्था पाहून खाली लोंबक ळणाऱ्या वीजवाहिन्यांमुळे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
  • असे अनेक ठिकाणचे लाईट पोल सडलेल्या अवस्थेत असून, मुख्य वीजवाहिनीही काही ठिकाणी जमिनीजवळ खाली आलेली आहे.
  • सचिन बेर्डे यांनी या वेळी स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करू न त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
  • या परिसरात अनेक ग्रामस्थ शेतीची कामे करतात. शेतात काम करताना खाली आलेल्या वीजतारा डोक्याला किंवा शरीराला लागण्याची शक्यता असल्याने मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त होत आहे.
  • या समस्येबाबत वेळोवेळी महावितरण भांबेड येथील वरि ष्ठ अधिकाऱ्यांशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थि तीची माहिती दिली.
  • सडलेले विजेचे खांब तातडीने बदलण्यात यावेत, मुख्य वीजवाहिनी योग्य उंचीवर न्यावी आणि ग्रामस्थांच्या सोयी साठी आवश्यक त्या ठिकाणी नवीन पोल उभारण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
  • एखादी दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा दुर्घटना घड ण्यापूर्वीच प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
  • ग्रामस्थांच्या जीविताचा प्रश्न असल्याने या कामाकडे तात डीने लक्ष द्यावे असे सचिन बेर्डे यांनी सांगितले.
  • गावातील सामान्य माणसांच्या अडचणी समजून घेऊन त्या संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि काम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करणे हीच आपली भूमिका असल्या चे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
  • अनेक परिसरामध्ये विजेच्या धक्याने जिवित हानी होत आहे हि डोळ्यासमोरची अनेक उदाहरणे आहेत.
  • तेंव्हा कुरंग बांधवाडीतील ग्रामस्थांना सुरक्षित वीजपुरवठा मिळावा, ही काळाची गरज आहे. आणि जिवित हानी टा ळावी ही युवा नेतृत्व सचिन बेर्डे यांची मागणी आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles