
परंडा-स्वारगेट एसटी बसचे वेळापत्रक कोलमडले; प्रवाशांचे प्रचंड हाल.
- प्रतिनीधी : परंडा : फारुख शेख :- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर परंडा-स्वारगेट (पुणे) आणि पुणे-परंडा या महत्त्वाच्या मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे.
- गाड्या तब्बल तीन-तीन तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. या गंभीर प्रकाराकडे परंडा आगार प्रमुख लक्ष देणार का, असा संतप्त सवाल प्रवासी वर्गातून उपस्थित केला जात आहे.

- नियोजनाच्या अभावाचा प्रवाशांना फटका
- सध्या दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे नोकरी आणि शिक्षणासा ठी बाहेरगावी असलेल्या नागरिकांची गावी ये-जा करण्या ची मोठी लगबग सुरू आहे.
- अशा गर्दीच्या काळात एसटी महामंडळाकडून जादा गा ड्यांचे आणि वेळेचे अचूक नियोजन होणे अपेक्षित होते.
- मात्र, महामंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे गाड्यांना नि श्चित वेळच उरलेली नाही. बस स्थानकावर तासनतास ता टकळत बसावे लागत असल्याने लहान मुले, महिला आ णि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
- खाजगी वाहनांकडून प्रवाशांची आर्थिक लूट
- वेळेवर एसटी बस उपलब्ध होत नसल्याने आणि प्रवासा चा खोळंबा होत असल्याने नाईलाजास्तव प्रवाशांना खा जगी ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागत आहे.
- सणासुदीचा फायदा घेत खाजगी वाहनचालकांकडून जा दा भाडे आकारले जात असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
- दुसरीकडे, एसटीचे हक्काचे प्रवासी खाजगी वाहनांकडे वळत असल्याने महामंडळाच्या उत्पन्नावरही मोठा परिणा म होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






