
पाथर्डी येथे ३,००० रुपयांची गावठी दारू जप्त; कळंब पोलिसांची कारवाई.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-कळब तालुक्यातील पाथर्डी येथील पारधी वस्ती भागात अवैध गावठी दारूची विक्री करणाऱ्या एका तरुणावर कळंब पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.
- या कारवाईत पोलिसांनी ३,००० रुपये किमतीची ३० लिटर गावठी दारू जप्त केली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- याबाबत अधिक माहिती अशी की,दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास कळं ब पोलिसांचे पथक गस्तीवर होते.

- यावेळी पाथर्डी येथील पारधी वस्ती भागात विलास लक्ष्म ण पवार (वय २९, रा. पाथर्डी, ता. कळंब, जि. धाराशिव) हा आपल्या राहत्या घराच्या बाजूला अवैध विक्रीच्या उद्दे शाने गावठी दारू बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
- पोलिसांनी तत्काळ सदर ठिकाणी छापा टाकला असता, आरोपीच्या ताब्यातून अंदाजे ३,००० रुपये किमतीची ३० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली.
- याप्रकरणी पोलिसांनी अवैध मद्य जप्त करून आरोपी वि लास लक्ष्मण पवार याच्याविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा नों दवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






