
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी शंभूराजे जगताप यांची बिनविरोध निवड.
- प्रतिनिधी : करमाळा : मुजंम्मील पटेल :- सोलापूर जि ल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत करमाळा ता लुक्यातील सोसायटी मतदारसंघातून शंभुराजे जयवंतराव जगताप यांची भाजपा कडून बिनविरोध निवड झाल्याबद्द ल करमाळा तालुक्यात जगताप गटाच्या वतीने जल्लोष करण्यात आला.

- करमाळा शहरात विविध ठिकाणी फटाक्यांची आतषबा जी आणि गुलालाची उधळण करून आनंद साजरा करण्यात आला.
- सोसायटी मतदारसंघातील उमेदवार सुभाष गुळवे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर शंभूराजे जगताप यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
- याबद्दल बँकेचे माजी व्हाईस चेअरमन तथा माजी शंभू राजे जगताप हे जगताप घराण्यातील तिसरी पिढी बँके च्या संचालक पदी निवड झाली.
- आमदार जयवंतराव जगताप यांचा अर्ज नामंजूर झाल्या मुळे जगताप गटाच्या वतीने युवा नेते खरेदी विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जगताप यांची उमेदवारी भाजप प्रणित पॅनल कडून अंतिम झाली होती.

- जगताप कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे बँकेच्या संचालक म्हणून निवड झाली आहे.
- यापूर्वी कै. नामदेवराव जगताप यांनी बँकेचे चेअरमन व संचालक म्हणून तसेच जयवंतराव जगताप यांनी व्हाईस चेअरमन व संचालक म्हणून प्रदीर्घकाळ कामकाज पाहिले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






