
तुळजापूर हत्याकांड प्रकरणी इम्तियाज जलील यांची धाराशिव अपर पोलीस अधीक्षकांशी भेट; फरार आरोपींच्या अटकेची व कुटुंबीयांना पोलीस संरक्षणाची मागणी.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- तुळजापूर येथे गे ल्या आठवड्यात झालेली समीर पटेल यांची हत्या आणि या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले सय्यद तबरेज यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी एम.आय.एम.चे (AIMIM) प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज ज लील यांनी आज दुपारी १:३० वाजता धाराशिव येथे अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची भेट घेतली.
- याप्रकरणी फरार आरोपींना तात्काळ अटक करून हा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालवा वा, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.

- या भेटीदरम्यान इम्तियाज जलील यांनी अपर पोलीस अ धीक्षक पांडकर यांच्याशी सविस्तर चर्चा करून संविधा निक अधिकारानुसार निवेदन (मेमोरेंडम) सादर केले.
- तसेच, पीडित समीर पटेल आणि जखमी सय्यद तबरेज यांच्या कुटुंबीयांच्या जीवितास धोका लक्षात घेता, त्यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
- या शिष्टमंडळात पीडित समीर पटेल आणि सय्यद तबरेज यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते.
- त्यांच्यासोबत एमआयएमचे प्रदेश सरचिटणीस तथा विरो धी पक्षनेते समीर साजिद बिल्डर, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष शारेक नक्शबंदी, धाराशिव जिल्हाध्यक्ष शहे बाज काजी, शहराध्यक्ष तौफिक भाई यांच्यासह छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील पक्षाचे काही नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






