
देवगाव खुर्द येथील अतिक्रमण आणि जातीय छळाच्या निषेधार्थ परंडा तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सूरू.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- तालुक्यातील देवगा व खुर्द येथील अतिक्रमण काढण्यात यावे आणि सुरू अ सलेल्या जातीय छळावर कठोर कारवाई करावी, या प्रमु ख मागण्यांसाठी परंडा तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

- ‘महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल’ आणि ‘महाराष्ट्र रा ज्य कामगार सुरक्षा दल’ (ता.परंडा, जि.धाराशिव) यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन छेडण्यात आले आहे.
- प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
- “जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत आणि आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे धरणे आंदोलन मागे घेतले जाणार नाही,” असा ठाम इशारा आंदोलकां च्या वतीने देण्यात आला आहे.

- या आंदोलनात राजाभाऊ शिंदे, युवराज कसबे, अप्पा गायकवाड, अतुल सोनवणे, गोवर्धन शिंदे, अविनाश शिंदे, शिवाजी गायकवाड, संदीप शिंदे, आनंद शेलार, सौ. उज्व ला गायकवाड, सौ.लक्ष्मीबाई जाधव, विशाल गायकवाड यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






