
भांडुप येथे झालेल्या ओपन डेडलिफ्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत कु.सुशांत सोनू आग्रे याने पटकावले सुवर्ण पदक.
- प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :- तालुक्यातील रावारी गावचे सुपुत्र,सह्याद्री रत्न पुरस्कार प्राप्त आणि नॅशनल पाॅ वरलिफ्टींग सुवर्ण पदक विजेते कु.सुशांत सोनू आग्रे यांने दि. ३ मे २०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित राम कली स्कूल, केदार चौक, गाढव नाका, भांडुप येथे ओपन डेडलिफ्ट चॅम्पियनशिप २०२५ या स्पर्धेत ७० किलोग्रॅम वजनी गटामध्ये बॉडी वजन ६५.७०० किलोग्रॅम वजन असून २२७.५०० किलोग्रॅम वजन उचलून सुवर्ण पदक आणि स्ट्राँगमॅन किताब पटकावला.
- यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस भांडुप तालुका अध्यक्ष श्री.रविंद्र जैसवालजी आणि भांडुप तालुका महिला अध्यक्ष सौ.मंजु श्री.जैसवाल मॅडम,भारत श्री.सुवर्ण पदक विजेता श्री.जगे श दैत, इंडिया पाॅवर लिफ्टींगचे जनरल सेक्रेटरी श्री श्रीबा स गोस्वामी सर, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या सौ. पल्लवी गोस्वामी मॅडम, इंटरनॅशनल पाॅवर लिफ्टींग सुवर्ण पदक विजेते श्री.अशोक दीक्षित सर, राष्ट्रवादी काँग्रेस प क्षाचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
- कु. सुशांत आगरे याला मिळालेल्या पदका बद्दल लांजा तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/