Fixed Deposits : खुशखबर……… !!!
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
रिपोर्टर: न्यूज रूम ऑपरेटर : Fixed Deposits : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे.
मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी Shriram Finance Limited ने देखील ग्राहकांना नवीन वर्षाची भेट देत फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे.
1 जानेवारी 2023 पासून नवीन दर लागू
Shriram Finance Limited च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, हे नवीन दर 1 जानेवारी 2023 पासून लागू झाले आहेत. या NBFC मध्ये FD वर 9.36% व्याज मिळवण्याची चांगली संधी आहे. श्रीराम फायनान्सने 12 महिन्यांच्या FD वरील व्याजदर 7 टक्क्यांवरून 30 bps ने वाढवून 7.30 टक्के तर 18 महिन्यांच्या FD वरील व्याजदर 7.30 टक्क्यांवरून 20 bps ने वाढवून 7.50 टक्क्यांवर आणले. Fixed Deposits
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच इंडियन ओव्हरसीज बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, येस बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे. Fixed Deposits
RBI कडून रेपो दरात वाढ
अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space