हातदेतील पाटीलवाडी ग्रामस्थ मंडळ आयोजित ३३ वा वार्षिक क्रीडा महोत्सव खेळीमेळीत संपन्न.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- पाटीलवाडी ग्राम स्थ मंडळ – स्थानिक, पाटीलवाडी ग्रामस्थ मंडळ – मुंबई व श्री.रामेश्वर क्रिडा मंडळ– मुंबई, (हातदे- पाटीलवाडी) यां च्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३३ वा वार्षिक क्रिडा महो त्सव कै. प्रदिप सखाराम चव्हाण स्मृतीचषक या नावाने आयोजित करण्यात आला होता.
  • या महोत्सवाअंतर्गत गाव मर्यादित व खुल्या क्रिकेट स्पर्धां शनि व रवि दि. १० व ११ मे २०२५ तांबटीचा माळ येथील क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आल्या.
  • या क्रिकेट स्पर्धांसाठी हातदे गावचे सुपुत्र, समाजसेवक व दानशूर व्यक्ति श्री.दिगंबर यशवंत चव्हाण यांनी कै. प्रदिप सखाराम चव्हाण यांच्या स्मरणार्थ प्रथम क्रमांकाचे बक्षी स रोख रक्कम ५०,००० रूपये व आकर्षक चषक दिले होते.
  • तसेच द्वितीय क्रमांकाचे बक्षीस रोख रक्कम २५,००० रुपये व आकर्षक चषक श्री. रामेश्वर पतसंस्था हातदे पा टीलवाडी यांच्या वतीने देण्यात आले होते.
  • सदर क्रिकेट स्पर्धेचे सूत्रसंचालन श्री.सचिन शाहू चव्हाण यांनी केले. या स्पर्धेसाठी अध्यक्षपद श्री.शाहू अनाजी च व्हाण यांनी भूषवले तर उ्दघाटन श्री.शशिकांत गणपत सुतार (अध्यक्ष- राजापूर वकील संघटना) यांच्या हस्ते पार पडले.
  • बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी श्री.विनोद नारायण चव्हा ण यांनी सूत्रसंचालन केले व श्री.रघुनाथ अंबाजी चव्हाण यांनी अध्यक्षपद भूषवले तसेच श्री.दिगंबर यशवंत चव्हा ण यांच्याशुभहस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक वितरण केले गेले.
  • तसेच या क्रिडा महोत्सवासाठी श्री.संजय शिवराम मोरे (पोस्ट मास्टर-हातदे),श्री.विश्वनाथ पाटकर(सरपंच-हातदे) , श्री.मनोहर अनंत चव्हाण (तंटा- मुक्ती समिती,अध्यक्ष), श्री.मनोहर अनाजी चव्हाण (महाशिवरात्री समिती अध्य क्ष- हातदे), श्री.सुहास भाई आयरे (संस्थापक – आत्माराम आयरे विद्यालय मिळंद), श्री.एस.पी.पांचाळ (हरळ – समा जसेवक), सौ.दीपा चव्हाण (पोलीस पाटील,हातदे), श्री.सं भाजी (आप्पा) चव्हाण (सामाजिक कार्यकर्ते), श्री.समीर राणे (शिवसेना शाखाप्रमुख जोगेश्वरी पश्चिम वार्ड क्र.६१), श्री. वसंत चव्हाण, श्री. हरिदास चव्हाण, श्री. सुशील ह. चव्हाण (सामाजिक कार्यकर्ते) व श्री. विश्वनाथ रासम हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
  • या स्पर्धांमध्ये राजापूर, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, मुंब ई, ठाणे या भागातून १६ संघ सहभागी झाले होते, अत्यंत भव्य-दिव्य, चुरशीच्या झालेल्या या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमां क मनोज इलेव्हन कणकवली, व्दितीय क्रमांक आझाद इलेव्हन खारेपाटण या क्रीड़ामहोत्सवामध्ये आपल्या खे ळाचे उत्तम कौशल्य दाखवत काही खेळाडू बक्षीसांचे मा नकारी ठरले.
  • मालिकावीर -बिट्टू मुकादम (आझाद इलेव्हन खारेपाटण). उत्कृष्ट फलंदाज म्हणून पारितोषिक पटकाविले ते मनोज इलेव्हन कणकवली संघाच्या सौरभ याने त्याच प्रमाणे उ त्कृष्ट गोलंदाज ठरला आझाद इलेव्हन खारेपाटण संघाचा सकलीन आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला प्रशांत पिंगळे (मनोज इलेव्हन कणकवली). या सर्वांना आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
  • या स्पर्धांदरम्यान गावातील तसेच परिसरातील अनेक मा न्यवर व क्रिडा रसिकांनी उपस्थिती लावली. तसेच या स्प र्धा मोठ्या उत्साहात पार पाडण्यासाठी मंडळाच्या पदाधि काऱ्यांनी व सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.
  • त्याचप्रमाणे पाटीलवाडी अंतर्गत पाटीलवाडी प्रीमियर ली ग (पर्व पहिले) दि. १०/०५/२०२५ रात्री ठीक ८.०० वाज ता अंडर-आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles