
मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिर येथे राखी बनविणे कार्यशाळा संपन्न.
- प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड : नामदेव मेहेर :- प्रो.ए.सो. शिवाजीनगर पुणे- ०५ चे मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिर येथे शनिवार दि. २६/०७/२०२५ रोजी पालक शिक्षक संघ,शा लेय व्यवस्थापन समिती व माता पालक संघ यांच्या संक ल्पनेतून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राखी बनविणे कार्यशा ळा आयोजित करण्यात आली.

- २६ जुलै कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून सीमे वरील जवानांना राखी पाठविण्यासाठी शिक्षक पालक सं घाच्या उपाध्यक्षा सौ.शारदा हागे, सौ.पूनम वाघ, सौ. कवि ता सावंत, सौ. राजश्री नागरगोजे व इतर सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या तयार करून सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

- शाळेचे मुख्याध्यापक श्री.पांडुरंग मराडे यांनी प्रास्ताविका त सांगितले की आपल्या भारत देशाच्या सीमेवर अहोरात्र तैनात असलेल्या शूर जवानांमुळेच आपण सर्वजण सुर क्षित आहोत व सर्व सण- उत्सव मोठ्या आनंदाने साजरे करत असतो.

- यावेळी भारतीय संस्कृती संस्था पुणे चे कार्याध्यक्ष मा.श्री. डॉ.नंदकिशोर एकबोटे हे उपस्थित होते. दरवर्षी आपल्या भारतीय लष्करातील जवानांना लाखो राख्या पोस्टाद्वारे पाठवून त्यांच्या विषयी कृतज्ञतेचा चा भाव जागृत करण्या चे काम त्यांच्या संस्थेकडून अविरतपणे सुरू आहे.

- इयत्ता १ ली ते ४ थी च्या लहान विद्यार्थ्यांनी आपल्या चि मुकल्या हातांनी,देशभक्तीच्या भावनेने राख्या तयार करू न व आपल्या हस्ताक्षराने सैनिकांना पत्र लिहून डॉ.नंदकि शोर एकबोटे व समृद्धी एकबोटे यांच्याकडे सुपूर्द केल्या.
- माया सुर्यवंशी व नरेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कब – बुलबुल च्या पथकाने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
- कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास माळी यांनी केले. श्रीमती वैशाली आटोळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले फलकलेखन किरण वारके यांनी केले.
- कार्यक्रमाचे आयोजन जोगेश्वरी पैलवान,अपर्णा घोलप, शितल गव्हाणे व रोहिणी माने यांनी केले.

- अशा नाविन्यपूर्ण उपक्रमास शाळा समिती अध्यक्ष मा.श्री .मानसिंग साळुंके, शाळेचे व्हिजिटर मा.श्री.प्रमोद सावंत, संस्थेचे कार्याध्यक्ष मा.श्री.गजानन एकबोटे यांनी शुभेच्छा देऊन पालक संघाच्या सर्व सदस्यांचे आभार मानून धन्यवाद व्यक्त केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











