जिल्हा परिषद शाळा कात्राबाद येथे केशर आंब्याचे झाड देऊन आणि शैक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा.

  • प्रतिनिधी : धनंजय गोफने :- परंडा तालुक्यातील कात्रा बाद येथे दिनांक 5ऑगस्ट 2025 वार मंगळवार रोजी जि प प्राथमिक शाळा कात्राबाद येथे शाळेचे मुख्याध्यापक : शिवश्री रविंद्र माधवराव कापसे.
  • ( संचालक धाराशिव जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्था तथा जिल्हा उपाध्यक्ष शिक्षक संघ धाराशिव ) यांच्या वा ढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना एक पे ड सर के नाम या उपक्रमांतर्गत,केशर आंब्याचे एक झाड, शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आला.
  • यावेळी शाळेचे सहशिक्षक दीपक मिरकले सर यांनी शाळे च्या वतीने राबवण्यात येणाऱ्या वाढदिवस एक शैक्षणिक चळवळ या उपक्रमाची माहिती सांगितली.
  • या उपक्रमांतर्गत शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, शाळा व्यव स्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य तसेच शिक्षण प्रेमी नागरिक आपला वाढदिवस शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून करतात.
  • वाढदिवसाच्या निमित्ताने मिळालेले शैक्षणिक साहित्य वि ध्यार्थ्यांना वर्षभर पुरविले जाते.
  • या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे पालकही आपल्या मुलांचा वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटप करून करतात असे सांगण्यात आले.
  • यावेळी गावातील तरुणांनी आणि शिक्षणप्रेमी नागरिकां नी आपले वाढदिवस अनावश्यक खर्च टाळून शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून करा वेत असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक शिवश्री रविंद्र कापसे यांनी आपल्या मनोगतातून केले.
  • यावेळी ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या वतीने परसराम कोळी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
  • वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ए क पेड सर के नाम,या उपक्रमाचे कौतुक केले व शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
  • सहशिक्षक मिरकले सर यांनीही आपल्या मनोगतातून वा ढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
  • या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पर मेश्वर बोराडे,उपसरपंच गणेश कोकाटे, परसराम कोळी,ग्रा मसेवक शिंदे साहेब, उपाध्यक्ष इमरान पटेल, इर्शाद पटेल, समाधान देवकर मेजर, अमोल गरड, तात्यासाहेब मोरे, गो पीनाथ बोराडे, विलास गरड, बापुसाहेब बोराडे,सुलभा गर ड, तब्बसुम पटेल मॅडम,मुख्याध्यापक रविंद्र कापसे सर, सहशिक्षक दीपक मिरकले सर,विद्यार्थी,पालक उपस्थित होते. : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कात्राबाद
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles