
आलेश्वरच्या उपसरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव कायदेशीरच जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील आलेश्वर येथील उपसरपंचांविरुद्ध बहुमताने मंजूर केलेला अविश्वास ठराव कायदेशीरच असल्याचा आदेश जिल्हाधि कारी किर्ती किरण पुजार यांनी ११ ऑगस्टला दिला आहे.
- तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली २५ मे रोजी आलेश्वर ये थील ग्रामपंचायतीत झालेल्या विशेष सभेत उपसरपंचांवि रुद्ध अविश्वास ठराव मंजूर झाला होता.

- आलेश्वरच्या उपसरपंच वंदना चव्हाण यांनी जिल्हाधिका ऱ्यांकडे अविश्वास ठराव रद्द करण्यासाठी दाखल केलेले अपिल जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी नामंजूर केले.
- आलेश्वर ग्रामपंचायतीचे एकूण ७ सदस्य आहेत. जात वैध ता प्रमाणपत्र वेळेत न दिल्याने सात सदस्यांपैकी सरपंचा सह आणखी एक ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरले व सर पंच अपात्र झाल्याने ग्रामपंचायतीचा पदभार उपसरपंच वंदना चव्हाण यांच्याकडे दिला होता.
- विद्यमान पात्र पाच सदस्यांपैकी शीला पाटील, रोशनबी मुलानी, ज्योती ठोसर व लक्ष्मण धनवे या चार सदस्यांनी विद्यमान उपसरपंच वंदना चव्हाण यांच्याविरुद्ध ‘सदस्यां ना विश्वासात घेत नाहीत.
- त्यांच्या पतीच्या दबावाने सदस्यांकडून मनमाणीप्रमाणे ठराव मंजूर करुन घेतात, पत्नी उपसरपंच असताना पती उपसरपंचांच्या खुर्चीवर बसतात’. आदी कारणे देत उप सरपंचावर २३ मे रोजी अविश्वास ठराव दाखल केला होता.
- चार सदस्यांमार्फत विश्वासाची नोटीस मिळाल्यानंतर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात २८ मे रोजी विशेष सभा घेतली.
- या सभेत उपसरपंच उपस्थित राहिल्या आणि इतर चार सदस्य, असे एकूण पाच सदस्य हजर होते. विशेष सभेत उपसरंपचाविरुद्ध ठराव ४ विरुद्ध एका मताने मंजूर झाला.

- जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे व विधिज्ञांचा युक्तीवाद एकुण घेतला. गैरअर्जदारांचा युक्तिवाद ग्राह्य धरत जिल्हाधिकाऱ्यांनी आलेश्वरच्या उपसरपंच वंदना चव्हाण यांच्याविरुद्ध मंजूर झालेला अविश्वास ठराव बरोबर व कायदेशीर असल्याचा निकाल दिला.
- गैरअर्जदारांच्या वतीने विधिज्ञ ॲड. संतोष सूर्यवंशी, ॲड. अनिकेत जगताप, ॲड.सनी राशनकर, ॲड.निरंजन कोक णे यांनी काम पाहिले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











