
ऋषिपंचमी निमित्त लांजा मांडवकर वाडी, विलवडे कोंड येथे शक्ति तुऱ्याचा जंगी सामना; ओणीचे प्रसिद्ध शाहीर विश्वनाथ दादू मटकर यांचे रंगभूमीवर पुनरागमन.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- ऋषिपंचमी आणि श्री सत्यनारायण महापूजा निमित्ताने गुरुवार दि. २८ ऑग स्ट २०२५ रोजी रात्री १०.०० वाजता मांडवकर वाडी, वि लवडे कोंड ता.लांजा येथे शक्तिवाले शाहीर विश्वनाथ दादू मटकर सह्याद्री सहाय्यक जाकडी नृत्यकला मंडळ,तांबळ वाडी, ओणी ता.राजापूर विरुद्ध तुरेवाले शाहीर जितेश ज यसिंग गुरव शाखा बाप्पा मोरया नृत्य कलापथक पेंडखले चिपटेवाडी राजापूर या दोन्ही शाहिरां मध्ये तुफान जुगल बंदी रंगणार आहे.

- गेली अनेक वर्षे जाकडी या पारंपरिक नृत्यकलेपासून अ लिप्त असलेले रत्नागिरी जिल्ह्यात नाव लौकीक प्राप्त कलेले शक्तिवाले शाहीर विश्वनाथ मटकर हे रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत.
- सुमधुर आवाज व शास्त्रोक्त पद्धतीवर आधारित गायकी यासाठी ते प्रसिद्ध आहेत त्यांचे वडील कै.दादू अनाजी म टकर यांनीही गेली अनेक वर्षे रंगभूमी गाजवली होती.
- प्रसिद्ध शक्तिवाले शाहीर म्हणून त्यांची साऱ्यांना ओळख आहे त्यांचाच वारसा त्यांचे सुपुत्र विश्वनाथ यांनी पुढे नेत शक्ति तुरा लोककलेला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.
- मध्यंतरी या कलेपासून अलिप्त असलेले शाहीर श्री विश्व नाथ मटकर पुन्हा पुनरागमन करत नवी रंगभूमी गाजव ण्यास सज्ज झाले आहेत.
- गणेशोत्सवात होणाऱ्या या दोन्ही तुल्यबळ शाहीरांच्या सा मन्याला उपस्थित राहून शाहीरांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोजक श्री दत्ताराम गोविंद मांडवकर आणि श्री भगवान गोविंद मांडवकर यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











