
लायन्स क्लब निगडी तर्फे गरजूंना मदत.
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- लायन्स क्लब निगडीचे आधारस्तंभ ज्येष्ठ सदस्य दिवंगत हरिदास नायर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्ताने परिसरातील गरजू मजूर 25 महिलांना घरगुती अन्नधान्य किट चे वाटप करण्यात आले.

- प्रसंगी त्यांच्या आठवणींना उजाळा देत पुढील काळात चांगले सेवाकार्य करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
- या प्रसंगी क्लबच्या अध्यक्षा रश्मी नायर क्लब चे संस्थाप क सदस्य आर.एस.कुमार, जयश्री मांडे, क्लब चे संचाल क हर्ष नायर ,ज्येष्ठ सदस्य चंद्रशेखर पवार, सुदामराव मो रे, सलीमभाई शिकलगार,राजीव कुटे, दिलीपसिंह मोहिते, आदिनाथ मुसमाडे, देविदास ढमे, संतोष बांदेकर तसेच महिला सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

- सेवाकार्य प्रमुख चंद्रशेखर पवार यांनी नियोजन व सहका र्य केले होते. क्लबच्या सचिव मंजिरी कुलकर्णी, खजिनदा र शिवकन्या मुसमाडे, उपाध्यक्षा शिल्पी कुमार यांनी कार्य क्रमाचे आयोजन केले होते.
- क्लब च्या अध्यक्षा रश्मी नायर यांनी आपले मनोगत व्य क्त केले व सर्वांचे आभार मानले.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











