सालोड येथील साने गुरुजी विद्यालयात विविध उपक्रमांनी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती साजरी.

  • प्रतिनिधी : सचिन कोयरे :- जनजातीय गौरव पंधरवडा अंतर्गत सालोड येथील साने गुरुजी माध्यमिक विद्यालया त सोमवारी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
  • विद्यार्थ्यांनी घेतलेल्या उपक्रमांमुळे विद्यालय परिसरात सामाजिक जागरूकता, इतिहासाची जाण आणि प्रेरणा दायी वातावरण निर्माण झाले.
  • कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक वि नोद भगत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मारोती मेश्राम, बंडू सिडाम, कुमरे, भगवान राजूरकर यांच्यासह शिक्षक किशो र भोयर, बबीता ढोके, शिल्पा ठाकरे, वैशाली ढोले, शिक्ष केतर कर्मचारी गोळेकर, गुघाणे, राऊत, ठाकरे तसेच गा वातील मान्यवर आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
  • विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा यांच्या आदर्शमय जीवनावर आ धारित भाषण, निबंध, चित्रकला, घोषवाक्य लेखन, गटच र्चा असे विविध उपक्रम सादर केले.
  • त्यांच्या कार्यातून आदिवासी समाजातील एकता, स्वाभि मान आणि संघर्षमय इतिहासाची झलक पहायला मिळाली.
  • मुख्याध्यापक विनोद भगत यांनी आपल्या भाषणात बिर सा मुंडा यांनी आदिवासी समाजाला दिलेली दिशा,त्यांच्या क्रांतिकारक आंदोलनाची प्रेरणा आणि आजच्या पिढीपुढे असलेल्या जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या.
  • पाहुण्यांनीही विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक करून त्यां ना सामाजिक कार्यात सक्रिय राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles