जाकीर काझीच्या मेंदूच्या पिटोटरी ग्लॅन्ड च्या ट्रान्सफेनॉयडल ची जटील शस्त्रक्रिया यशस्वी; रुग्णाच्या वतीने डॉक्टरांचा सत्कार.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा येथील जाकी र काझी यांच्या मेंदूत मागील सहा महिन्यापूर्वी एक गाठ आली होती. त्या गाठीमुळे त्यांच्या दृष्टीस फरक पढत चा लले होते. दिवसेंदिवस दृष्टी कमी होत होती.
  • त्यासाठी त्यांनी अनेक नेत्रतज्ञ डॉक्टरांना दाखवन वेगवेग ळ्या तपासण्या केल्या होत्या. त्यातून कांहीही निष्पन्न झाले नव्हते.
  • त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी मेंदूविकार तज्ञ डॉक्टरांना दाखविण्याचा निर्णय घेतला.
  • त्याप्रमाणे त्यांनी बार्शी, सोलापूर येथील कांही डॉक्टरांना दाखविले. संबंधित डॉक्टरांनी विविध तपासण्या करायला लावल्या.
  • तपासणीत मेंदूच्या खाली डोळ्यांना रक्तपुरवठा करणा ऱ्या दोन नसांमध्ये एक नस फुटून रक्त गोठल्याने गाठ त यार झाली असल्याचे दिसून आले.आणि ही गाठ काढल्या शिवाय पर्याय नाही असा सल्ला दिला.
  • मेंदू सारख्या जटील शस्त्रक्रिया या पुणे किंवा मुंबईला हो त असल्याने रुग्ण व नातेवाईक चिंतेत होते.
  • परंतु बार्शी येथील जगदाळे मामा धर्मादाय रुग्णालयात मेंदू व पाठीच्या मणक्याच्या किचकट शस्त्रक्रिया येथील प्रसिद्ध मेंदूतज्ञ डॉक्टर किशोर गोडगे हे करतात अशी मा हिती मिळाल्याने काझी यांना डॉ.किशोर गोडगे यांना दाखविण्यात आले.
  • डॉक्टरांनी सर्व रिपोर्ट बघून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला व 100% यशस्वी होण्याची खात्री दिली.त्यानुसार संबंधित रुग्णाची दि. 8 डिसेंबर रोजी डॉ.किशोर गोडगे यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली.
  • या शस्त्रक्रियेसाठी डॉ कांदे,श्रीकांत सोरेगावकर, हेमंत लां डे, नितीन इंगोले, सुजित कुंभारे, विनोद घोणे, महेश कुल कर्णी, अभिजित क्षीरसागर व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
  • मेंदूच्या अशा शस्त्रक्रिया पुणे मुंबई सारख्या शहरात होत होत्या. त्यासाठी प्रचंड मोठा खर्च व मानसिक त्रास सहन करावा लागत होता.
  • पण आता बार्शीच्या डॉ.जगदाळे मामा धर्मादाय रुग्णाल यात मेंदू, हृदय व हाडाच्या संपूर्ण शस्त्रक्रिया महात्मा ज्यो तिबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत होत अस ल्याची माहिती डॉ.किशोर गोडगे यांनी दिली.
  • शस्त्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल रुग्ण व नातेवाईकांच्या व तीने डॉ किशोर गोडगे यांचा शाल, बुके,शिवाजी महाराजां ची प्रतिमा व मिठाई भेट देऊन सत्कार करण्यात आला.
  • यावेळी जाकेर काझी जुल्फीकार काझी, नासेर काझी, ज हांगीर मोमीन, आसिफ पठाण, मुस्तेजाब काझी, अखला क काझी,सोहेल काझी, जियान काझी, सैफ काझी जैद काझी उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles