राजापूर-शिळ-सौंदळ रेल्वे स्टेशन जाणारा रस्ता उंचीकरण, रुंदीकरणासाठी अरविंद लांजेकर यांचे बांधकाम विभागाला निवेदन.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- शहराकडून शीळ, गोठणे दोनिवडे, चिखलगाव सौंदळ रेल्वे स्टेशनकडे तसेच पाचल कोल्हापूरकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण, उंचीक रण मजबुतीकरण करावे.
  • अशी मागणी कोंडये येथील सामाजिक कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभि यंता श्री देसाई आणि श्री बावधनकर यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे.
  • या मार्गावर सौंदळ रेल्वे स्थानक असल्याने तालुक्याच्या पूर्व भागातील जनतेला हे स्थानक जवळचे असल्याने वे ळ व पैसा वाचत आहे.
  • त्यामुळे या स्थानकांवर मुंबई कडे येणाऱ्या व जाणाऱ्या तसेच गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते.
  • सदरचा रस्ता अर्जुना नदी लगत असल्याने या रस्त्यावरील सखल भागात पाणी येत असल्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद होतो.
  • राजापूर मोठ्या ब्रिज नजीक पावसकर वाडी, शिळ गांगो मंदीर ब्रिजजवळ, गोठणे दोनिवडे येथील साखरकर आ णि खलिफे घराच्या नजदीक,‌ चिखलगाव बादयाचा माळ व पाजवेवाडी नजीकचा सखल भाग आदी विविध ठिका‌ णी पुराचे पाणी रस्त्यावर येऊन जनजीवन विस्कळित होते. आणि या भागातील येणाऱ्या – जाणाऱ्या जनतची प्रचंड गैरसोय होते.
  • त्यामुळे या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण,उंचीकरण, मजबु तीकरण करणे गरजेचे आहे असे श्री अरविंद लांजेकर यां नी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles