
कोकणातील स्थलांतर थांबविण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी दादर येथे दि. १८ जानेवारी रोजी मार्गदर्शन सभा.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- कोकणातून मुंबईत नोकरी व्यवसाया निमित्त होणारे वाढते स्थलांतर यामुळे कोकणात जवळपास सर्वच गावात घरे बंद पडत चालली आहेत.
- कोकणातून होणारे हे स्थलांतर रोजगार निर्मिती चळवळी तून थांबवता येईल यावर चर्चा करण्यासाठी लांजा कॅश्यू फार्मर प्रोडयूसर कंपनीच्या वतीने रविवार दि. १८ जानेवा री २०२६ रोजी दु. ३.३० वाजता रुम नं २१५, २ रा माळा, शारदाश्रम विद्यामंदिर, भवानी शंकर रोड, दादर (प) – ४० ००२८ येथे मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

- मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांनी गावच्या विकासासा ठी एकत्र यावे हा या सभेचा मुख्य उद्देश असून कोकणा तील गाव, वाड्या, सामाजिक संस्था,गाव,वाडी मंडळे पदा धिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी या सभेला उपस्थित रहावे व आपले विचार,आपली मते मांडावीत कोकणाती ल भविष्यातील घडामोडी, झपाट्याने होणारे स्थलांतर यावर विचारमंथन होणे आवश्यक आहे.
- सदर सभेला लांजा कॅश्यू फार्मर प्रोडयूसर कंपनी लि.चे चेअरमन श्री आनंद कांबळे तसेच सविस्तर माहिती (तज्ञ) श्री विजय भगते (डायरेक्टर) आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
- अधिक माहितीसाठी कंपनीचे मुंबई सपोर्ट टीमचे सुधीर चौगुले – 9224499396 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा hठttps://globaltimesnews.in/











