राजापूर–मुंबई सायंकाळी ५ वाजता सुटणारी एस. टी. पुन्हा सुरु करा- अझीम जैतापकर.

  • प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- राजापूर ते मुंबई सायंकाळी ५ वाजता सुटणारी एस.टी. बस सेवा पुन्हा सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी राजापूर काँग्रेस शहराध्यक्ष श्री.अ झीम इब्राहिम जैतापकर यांनी राजापूर आगार व्यवस्थाप कांना लेखी निवेदन सादर केले आहे.
  • ही बस सेवा केवळ आठ दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आ ली होती. मात्र काही कारणास्तव ती अचानक बंद करण्या त आल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत अस ल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
  • राजापूर–मुंबई हा मार्ग विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसे च रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेषतः सायंका ळी ५ वाजताची एस.टी.ही मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसा ठी सोयीची वेळ असल्याने या बसला मोठा प्रतिसाद मिळत होता.
  • मात्र अचानक ही सेवा बंद झाल्याने प्रवाशांना खासगी वा हनांचा आधार घ्यावा लागत असून आर्थिक भुर्दंडही सह न करावा लागत आहे.
  • त्यामुळे सदर बस सेवा पूर्वीच्या वेळेत तातडीने सुरू करा वी, अशी ठाम मागणी श्री. जैतापकर यांनी केली आहे.
  • निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, राजापूर श हरातील जवाहर चौक येथे वाहतूक नियंत्रण कक्ष असणे अत्यंत आवश्यक आहे.
  • सध्या प्रवाशांना गाडी कुठे आहे, ती कोणत्या वेळेला येणा र आहे याबाबत योग्य माहिती मिळत नाही.
  • वाहतूक नियंत्रण कक्ष सुरू झाल्यास एस.टी.बसच्या वेळा , मार्ग व बदल याबाबत प्रवाशांना त्वरित माहिती मिळेल आणि गोंधळ कमी होईल.
  • त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळून वाहतूक व्यवस्थाही अ धिक सुरळीत होईल.
  • तसेच नगरपरिषदेने नदीपात्रात सपाटीकरणाचे काम पूर्ण केले असल्याने एस.टी.बस नदीपात्रातून फिरवून आणा व्यात, अशीही मागणी श्री.जैतापकर यांनी केली आहे.
  • यामुळे शहरातील जवाहर चौकावरील वाहतूक कोंडी कमी होईल आणि बसचे वेळापत्रकही अधिक अचूक राहण्यास मदत होईल.
  • नदीपात्रातील रस्ता सुरक्षित असून त्याचा वापर केल्यास प्रवाशांना वेळेची बचत होईल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
  • राजापूर आगार व्यवस्थापकांनी निवेदन स्वीकारून याबा बत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे आ श्वासन दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
  • दरम्यान, प्रवाशांनीही सायंकाळी ५ वाजताची राजापूर–मुंबई एस. टी. पुन्हा सुरू व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
  • ही सेवा सुरू झाल्यास राजापूर परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून एस. टी. महामंडळालाही चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles