भाजपचे जि. प. उमेदवार शरद पवार यांचा गाव भेट दौरे चालू.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- “समाजाशी सातत्य पूर्ण संवादातूनच सक्षम नेतृत्व घडते,” असे प्रतिपादन कर त भाजपचे जिल्हा परिषद उमेदवार शरद पवार यांनी आ पल्या निवडणूक प्रचारात थेट जनसंवादाला प्राधान्य दिले आहे.
  • गावागावात भेटी देत, घराघरात जाऊन नागरिकांशी सं वाद साधत मतदारांच्या समस्या समजून घेण्यावर त्यांनी भर दिला आहे.
  • जिल्हा परिषद ही ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाची प्रमुख यंत्रणा असल्याने स्थानिक प्रश्नांची जाण असलेले व लोकांशी सतत संपर्कात असलेले नेतृत्व आवश्यक अ सल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
  • पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण, शेती, युवकां चा रोजगार तसेच महिलांच्या प्रश्नांबाबत नागरिकांकडून थेट अभिप्राय घेतला जात असून, या प्रश्नांना प्राधान्याने सोडवण्याची ग्वाही त्यांनी दिली.
  • प्रचारादरम्यान बैठका, पदयात्रा,छोट्या सभा तसेच वैयक्ति क संवादाच्या माध्यमातून मतदारांशी थेट संपर्क साधण्या त येत आहे.
  • “लोकप्रतिनिधी हा जनतेपासून दूर न राहता समाजाचा एक घटक म्हणून काम करणारा असावा,” हीच भाजपची भूमिका असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
  • विकास ही केवळ घोषणा न राहता प्रत्यक्ष कामातून दिस ली पाहिजे, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
  • भाजपच्या विकासात्मक धोरणांवर विश्वास ठेवत अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी होत आहेत.
  • जनतेच्या समस्या ऐकून घेणारे,संवाद साधणारे आणि का म करणारे नेतृत्वच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रभावी ठरेल, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
  • आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत समाजाशी सातत्यपू र्ण संवाद साधणारे व लोकाभिमुख नेतृत्व म्हणून भाजपचे उमेदवार शरद पवार यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles