नवनिर्माण जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे यांच्या वतीने भाऊसाहेब खरसडे यांचा गौरव.

  • प्रतिरोधी : फारूक शेख :- नवनिर्मान सेना जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे यांच्या परिवारकडून नूतन जिल्हा परि षद सदस्य मा.श्री.भाऊसाहेब(काका) खरसडे यांचा स्त्का र करण्यात आला.
  • तांदूळवाडी ता.परंडा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनी य कार्य केल्याबद्दल भाऊ साहेब खरसडे यांचा मनसे जि ल्हाध्यक्षांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.
  • स्थानिक मनसे जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्या त आलेल्या एका विशेष कार्यक्रमात हा सत्कार सोहळा पार पडला.
  • यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे कुसुम गण पत ठवळे व सौ शारदा दत्तू मूळूक मनसे शाखाध्यक्ष सूधी र भागवत बोराडे प्रवीन पाडूरंग खरसडे . सुरेश दत्तू ढवळे . दत्तात्रेय मूळूक अनुप मुळूक यांनी भाऊ साहेब खरसडे यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.
  • भाऊ साहेब खरसडे यांनी सातत्याने जनसामान्यांचे प्रश्न मांडले असून, पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांप र्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे.
  • त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन जिल्हाध्यक्षांनी त्यांचा गौरव केला.
  • याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्षांनी सांगितले की, “भाऊ साहेब खरसडे यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांमुळेच आज पक्षात एक नवी ऊर्जा निर्माण होत आहे.
  • आगामी काळात जनसेवेचा हा वारसा असाच पुढे सुरू राहावा हीच सदिच्छा.”
  • या सत्कार सोहळ्याला मनसेचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सत्काराला उत्तर देताना भाऊ साहेब खरसडे यांनी पक्षाने दिलेल्या सन्मानाबद्दल आभार मानले आणि भविष्यातही जोमाने काम करत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles