परंडा येथे राजेंद्र पाटील यांचे उपोषण पाचव्या दिवशी सुटले; प्रकृती बिघडल्याने उपजिल्हा रुग्णालयात दाखल.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- कंडारी येथील राजें द्र उत्तरेश्वर पाटील हे मागील पाच दिवसांपासून विविध मा गण्यांसाठी तहसील कार्यासमोर उपोषणास बसलेले अस ताना पाचव्या दिवशी प्रशासनाच्या शिष्टाईनंतर अखेर उपोषण सोडले.
  • उपोषणकर्त्याला नारळ पाणी पाजताना तहसील कार्याल याचे नायब तहसीलदार विजय बाडकर, पेशकर, किणीक र पंचायत समितीचे बीडीओ (वर्ग २) कुभेफळ चे उपसर पंच फारूक शेख मंकाळे पचांयत समिति क्रमच्यारी यांनी पोलीस प्रशासनाचे गोपनीय शाखा नितीन गुंडाळे व अधि कारी यांच्या मदतीने पाटील यांना नारळाचे पाणी पाजून उपोषणाची सांगता केली.
  • पाचव्या दिवशी राजेंद्र पाटील यांची प्रकृती खालावल्याने परंडा उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.अबरार पठाण यांनी आ पल्या पथकासह उपोषणस्थळी धाव घेतली.
  • त्यांनी पाटील यांची वैद्यकीय तपासणी केली असता, त्यां ची तब्येत गंभीर असल्याचे निदर्शनास आले.
  • पुढील तातडीच्या उपचारांसाठी त्यांना तात्काळ रुग्णाल यात हलवणे गरजेचे असल्याचा अहवाल डॉ.पठाण यांनी पोलीस निरीक्षक आणि तहसील कार्यालयाला दिला.
  • प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मागण्यांबाबत सकारात्मक च र्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आणि ढासळत्या प्रकृ तीचा विचार करून पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.
  • यावेळी परंडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी, महसूल विभागा चे कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या पाटील यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles