नामांतर लढ्यातील सत्याग्रहींना आणीबाणीच्या धर्तीवर २० हजार रुपये सन्मान पेन्शन द्यावी; ‘एनडीएमजे’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

  • प्रातिनिधी : परंडा : फारूक शेख :- डॉ.बाबासाहेब आं बेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात तुरुंगवास भोगलेल्या सत्याग्रही, पँथर आणि भीमसैनिकांना आणी बाणीतील ‘जयप्रकाश नारायण सन्मान पेन्शन योजने’च्या धर्तीवर दरमहा २० हजार रुपये सन्मान पेन्शन लागू करा वी, अशी मागणी ‘नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस’ (NDMJ) संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
  • संघटनाचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते, राज्य खजिन दार शिवराम दादा कांबळे, राज्य संघटक पंचशीला राजेश कुंभारकर, राज्य निरीक्षक दिलीप आदमाने आणि राज्य प्रसिद्धीप्रमुख प्रमोद ज्ञानदेव शिंदे यांनी या संदर्भातील नि वेदन मुख्यमंत्री,मुख्य सचिव तसेच सामाजिक न्याय विभा गाच्या प्रधान सचिवांना पाठवले आहे.
  • २० वर्षांचा संघर्ष आणि त्याग
  • १९७४ ते १९९४ या २० वर्षांच्या काळात मराठवाडा वि द्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासा ठी दलित पँथर, विद्यार्थी, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्यभर तीव्र लढा दिला.
  • या आंदोलनात अनेकांवर लाठीमार व गोळीबार झाला, शेकडोंना तुरुंगवास भोगावा लागला, तर अनेकांचे प्राण गेले.
  • पोलीस गुन्ह्यांमुळे अनेक तरुणांना शासकीय नोकऱ्यांना मुकावे लागले आणि कित्येक संसार उध्वस्त झाले. अखेर १४ जानेवारी १९९४ रोजी शासनाला नामविस्ताराचा निर्णय घ्यावा लागला.
  • “एकच न्याय, दोन मापदंड का?”
  • आणीबाणीत लोकशाहीसाठी लढणाऱ्या सत्याग्रहींना रा ज्य शासनाने ‘जयप्रकाश नारायण सन्मान पेन्शन योजने’ अंतर्गत दरमहा २० हजार रुपये पेन्शन, रेल्वे पास आणि वैद्यकीय सुविधा दिल्या आहेत.
  • मग त्याच न्यायाने डॉ.बाबासाहेबांच्या नावासाठी तुरुंगवा स भोगणाऱ्यांना या सुविधांपासून वंचित का ठेवले जात आहे, असा सवाल राज्य सचिव वैभव गिते यांनी उपस्थित केला आहे.
  • “जो न्याय आणीबाणीच्या सत्याग्रहींना, तोच न्याय बाबा साहेबांच्या नावासाठी तुरुंगात गेलेल्यांना मिळालाच पाहिजे.
  • सरकारने आता भेदभाव न करता तातडीने लेखी आदेश काढावा.” वैभव तानाजी गिते, राज्य सचिव, नॅशनल दलि त मुव्हमेंट फॉर जस्टिस
  • संघटनेच्या प्रमुख मागण्या:
  • नामांतर लढ्यातील सर्व सत्याग्रहींना दरमहा २०,००० रुपये सन्मान पेन्शन लागू करावी.
  • सत्याग्रहींना मोफत रेल्वे व एस.टी. प्रवास पास तसेच मो फत वैद्यकीय सुविधा द्याव्यात.
  •  मृत आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबीयांना या योजनेचा लाभ मिळावा.
  • ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर / नामविस्तार सन्मान पेन्शन योजना’ या नावाने स्वतंत्र योजना जाहीर करावी.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles