बहिणीकडे नेण्याच्या बहाण्याने तरुणीचे अपहरण; मनाविरुद्ध बळजबरीने विवाह लावल्याचा आरोप.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- बहिणीकडे घेऊन जाण्याचे खोटे आमिष दाखवून २० वर्षीय तरुणीला  कार मधून पळवून नेत तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने विवाह लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
  • तसेच विवाहानंतर तरुणीला बार्शी येथील एका खोलीत डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
  • या प्रकरणी परंडा तालुक्यातील टाकळी येथील सिद्धेश्वर महादेव आदलिंगे (वय २८) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ८७ आणि १२७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • बहिणीकडे नेण्याचे आमिष दाखवून कारमध्ये बसवले
  • पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित २० वर्षी य तरुणी ही जेऊर (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील रहिवासी आहे.
  • २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्या च्या सुमारास ती आपल्या घरी असताना आरोपी सिद्धेश्वर आदलिंगे तेथे आला.
  • त्याने ‘तुला तुझ्या बहिणीकडे यायचे का?’ असे सांगून तिला विश्वासात घेतले आणि काळ्या रंगाच्या होंडा सिटी कारमध्ये (क्र. एमएच-०१-सीपी-७५१८) बसवले.
  • मोबाईल बंद करून माळशिरस येथे नेले
  • आरोपीने सुरुवातीला टाकळी येथे जाण्याचे सांगितले; मात्र प्रवासादरम्यान कार माळशिरस रस्त्याकडे वळवली. यावेळी आरोपीने तरुणीकडील मोबाईल फोन काढून घेत बंद केला.
  • त्यानंतर तिला माळशिरस येथील ‘रेशीमगाठी मंगल कार्या लयात’ नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध विवाह लावल्याचा आरो प फिर्यादीत करण्यात आला आहे.
  • विवाहानंतर तिला बार्शी येथील एका खोलीत डांबून ठेव ल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
  • २१ नोव्हेंबर रोजी पोलिसांत फिर्याद
  • या घटनेनंतर पीडित तरुणीने २१ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजून १४ मिनिटांनी पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष हज र राहून तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत झिरो नंबरने गुन्हा नोंदविला.
  • घटनेचे ठिकाण करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पुढील तपासासाठी हा गुन्हा करमाळा पोलीस ठाणे, जिल्हा सोलापूर येथे वर्ग करण्यात आला आहे.
  • पोलीस निरीक्षक चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार म्हेत्रे यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून पुढील तपास करमाळा पोलीस करीत आहेत.
  • या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील पो लीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

 

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles