स्वयंम शिक्षण प्रयोग एल.आय.सी व एच.एफ.एल यांच्या संयुक्त विद्यमाने परंडा येथे महिला मेळावा संपन्न.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :- दि.10 जागतिक महिला दि नानिमित्त परंडा येथे स्वयंम शिक्षण प्रयोग व एल.आय.सी , एच.एफ.एल प्रकल्प अंतर्गत दि.१० रोजी एमटेक सभा गृहात महिला मेळावा संपन्न झाला.
  • प्रारंभी सावित्रीबाई फुले व स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या संस्थापिका प्रेमागोपालन यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
  • कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकात्मिक महिला व बालवि कास प्रकल्प अधिकारी गणेश कुकडे व पं.स.कृषी विस्ता र अधिकारी सुरज बोडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
  • या कार्यक्रमात गणेश कुकडे यांनी स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य , स्त्री म्हणजे मातृत्व , स्त्री म्हणजे क र्तत्व अशा शब्दात महिलांचे कौतुक केले.
  • आपल्या शैक्षणिक जीवनाविषयी मी कसा घडलो याविष यी महिलाना अनमोल मार्गदर्शन करत समाजामध्ये महि लांचे योगदान किती मोठे आहे याविषयी महत्त्व सांगितले.
  • कृषी विस्तार अधिकारी सुरज बोडके यांनी महिलांना महि ला दिनाच्या शुभेच्छा देत क्षितिजाकडे झेप “तू नारी , तू घे भरारी, व्यापून टाक क्षितिजे सारी या शब्दात आपले मत व्यक्त केले.
  • शासकिय विविध योजनेविषयी त्यांनी माहिती दिली. प्रेमा गोपालन प्रोड्युसर कंपनीच्या संचालिका सीमा सय्यद यां नी आयुष्यातील सर्व आव्हानावर मात करणाऱ्या प्रत्येक स्त्री ला मानाचा मुजरा जगाला एक सुंदर आणि चांगले स्थान बनविणाऱ्या सर्व यशस्वी महिलांना प्रेम , शक्ती व आनंदाच्या शुभेच्छा दिल्या.
  • स्वयम शिक्षण प्रयोग संस्थेच्या शाहेदा मुजावर यांनी तालु क्यात सुरु असलेल्या स्वयंमशिक्षण प्रयोग व एलआयसी प्रकल्प अंतर्गत जैविक शेती विषयी माहिती दिली.
  • या प्रकल्पा अंतर्गत तालुक्यातील पन्नास गावामध्ये काम सुरु असून या गावासाठी १३ महिला काम पाहत आहेत. या महिलांच्या मार्गदर्शना खाली शेतकरी महिलांनी गांडुळ खत बेड उभारणी केली आहे.
  • जीवामृत , दशपर्णी अर्क अग्नीअस्त्र तयार करून त्याची फवारणी कशी करावी याची माहिती महिलांना देत असून सेंद्रिय शेती चे महत्व पटवून देत आहेत.
  • रासायनिक खतामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी सें द्रिय शेती महत्वाची ठरत आहे. पन्नास गावामध्ये महिला उत्कृष्ठ काम करत आहेत.
  • कार्यक्रमात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान मा न्यवरांच्या हस्ते करण्यात आला . कार्यक्रमास स्वयंम शि क्षण प्रयोगच्या प्रशिक्षिका नौशाद अलिम शेख, संघमित्रा अंकुशराव,अश्विनी कदम गावपातळीवरील लिडर अन्नपु र्णा ठोसर, प्रिया हजारे, कामिनी वरपे, सोनाली पाटील, त नया सुतार, शीला राऊत, आरती चोबे’ सीमा कातूरे,विमल सुरवसे’ स्वातिका ओहोळ, भाग्यलक्ष्मी भोसले मेघा गाय कवाड, पुजा जाधव, यांच्या सह जवळपास 263 महिलां ची उपस्थिती होती.
  • कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रोड्युसर कंपनीचे संचालक गणे श नेटके व लिडर आरती चोबे यांनी केले तर आभार स्वयं म शिक्षण प्रयोग संस्थेच्या शाहेदा मुजावर यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles