रायपाटणच्या कु.सुरज नारकरची जिल्हा पोलीस दलात निवड, गावकऱ्यांकडून जंगी स्वागत.

  • प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- राजापूर मौजे राय पाटण गावचा सुपुत्र कु. सूरज सुभाष नारकर याची रत्ना गिरी जिल्हा पोलीस दलात निवड झाली असून त्याचे गा वात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
  • होळीचा मांड येथे त्याच्या आगमनावेळी फटाक्यांची आत षबाजी करण्यात आली तसेच ढोल – ताशांच्या गजरात बागवाडीपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
  • सूरज नारकर हा रायपाटणमधील बागवाडीचा रहिवासी असून त्याची आईदेखील रत्नागिरी पोलीस दलात कार्यर त आहे.
  • लहानपणापासूनच पोलीस दलात सेवा करण्याची इच्छा असलेल्या सूरजने यासाठी कठोर परिश्रम घेतले. त्याच्या मेहनतीला यश मिळत जिल्हा पोलीस दलातील निवड प्रक्रियेत तो यशस्वी ठरला.
  • सूरजच्या निवडीमुळे रायपाटण परिसरात आनंदाचे वाता वरण निर्माण झाले आहे. काही महिन्यांपूर्वीच खाडेवाडी येथील हरिओम शिंदे याची इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (IT BP) मध्ये निवड झाल्याने गावात उत्साहाचे वातावरण होते. आता पुन्हा एकदा पोलीस दलात निवड झाल्याने गावाचा अभिमान वाढला आहे.
  • सोमवारी सायंकाळी रायपाटण येथे सूरजचे आगमन हो ताच ग्रामस्थांनी त्याचे उत्स्फूर्त स्वागत केले. पारंपरिक पद्धतीने सुहासिनींनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या.
  • विशेष म्हणजे घोड्यावरून मिरवणूक काढून त्याचा सन्मा न करण्यात आला. गावकऱ्यांनी सूरज नारकर याचे अभि नंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles