परंडा तालुक्यातील कुंभेजा येथे सशस्त्र दरोडा; माजी सैनिक गंभीर जखमी; दरोडेखोरांचा शेतवस्तीवर थरार; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास, परिसरात भीतीचे वातावरण.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- तालुक्यातील कुंभे जा परिसरातील कॅनल पट्टीजवळ असलेल्या एका शेत वस्तीवर मध्यरात्री ५ ते ६ सशस्त्र दरोडेखोरांनी भीषण दरोडा टाकला.
  • या घटनेत घराचे मालक तथा माजी सैनिक विश्वनाथ जग ताप (वय ७० वर्षे) दरोडेखोरांशी दोन हात करताना गंभीर जखमी झाले आहेत.
  • दरोडेखोरांनी घरातील लाखो रुपयांचा मुद्देमाल लुटून पो बारा केला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
  • मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री १२.३० वा जेच्या सुमारास अज्ञात ५ ते ६ सशस्त्र दरोडेखोरांनी कॅनल पट्टी लगत असलेल्या जगताप यांच्या वस्तीवर हल्ला केला.
  • दरोडेखोर घरात घुसल्यानंतर जगताप यांनी त्यांना प्रति कार करण्याचा प्रयत्न केला.
  • यावेळी झालेल्या झटापटीत दरोडेखोरांनी त्यांच्यावर धार दार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात विश्वनाथ जगताप हे रक्ताच्या थारोळ्यात पडले.
  • घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज घेऊन दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
  • घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी जखमी जगताप यांना तात्काळ परंडा व त्यानंतर बार्शी येथील रुग्णालयात हलवले.
  • मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारा साठी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
  • पोलीस प्रशासनाकडून तपासाची चक्रे वेगवान
  • घटनेचे गांभीर्य ओळखून परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमोले यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
  • पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून परिसरात सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
  • महावितरणवर नागरिकांचा संताप
  • या घटनेमुळे कुंभेजा परिसरात घबराटीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, घटनेच्या वेळी परिसरात वीज पुरवठा खं डित होता.
  • ‘रात्रीच्या वेळी वीज नसल्याचा फायदा दरोडेखोरांना मि ळाला’ असा आरोप करत स्थानिक नागरिकांनी महावितर ण कंपनीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
  • वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळेच अशा घटनां ना वाव मिळत असल्याची भावना ग्रामस्थांनी बोलून दाखवली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles