
‘अबब…! विठोबा बोलू लागला’ आता कोकण दौऱ्यावर. प्रभाकर मोरे प्रमुख भूमिकेत.
- प्रतिनीधी : पाचल : प्रमोद तरळ :- अबब…..! विठोबा बोलू लागला हे ३० वर्षांपूर्वी रंगभूमीवर गाजलेलं, लक्ष्मी कांत बेर्डे यांची प्रमुख भूमिका असलेलं नाटक आता न व्या स्वरूपात पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
- या नाटकाचा कोकण दौरा सुरु होत आहे.१ मे रोजी संध्या काळी ६.३० वाजता स्वा. वि. दा.सावरकर नाट्यगृह रत्ना गिरी, २ मे रोजी रात्री ९.३० वाजता इंदिरा गांधी सांस्कृति क केंद्र चिपळूण तर ३ मे रोजी रात्री ९.३० वाजता रसिक रंजन नाट्यमंदिर दापोली येथे नाटकाचे प्रयोग होणार आहेत.
- आगाऊ तिकीट विक्री २७ तारीख पासून सुरुवात होत आहे.

- कोकणचे पारसमणी अशी ओळख असणारे हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे या नाटकात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
- अनेक हिंदी मराठी मालिका तसेच मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शनाचा तगडा अनुभव असणारे प्रशांत गिरकर यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.
- तर नमिता वागळे गिरकर यांनी या नाटकाची निर्मिती के ली आहे.
- नाटकाचे लेखन नीलकंठ नांदुरकर यांनी त्यावेळी एका स्पर्धेसाठी केले होते मात्र व्यावसायिक रंगभूमीवर देखील या नाटकाने खूप नावलौकिक मिळवलं. हे नाटक बालना ट्य असले तरी सर्वच स्तरातील मंडळींसाठी उत्तम मनोरं जन आहे.
- सर्व कलाकार, बालकलाकार, तंत्रज्ञ आणि संपूर्ण नाटका ची टीम विठ्ठलाचे दर्शन घडवेल असे दिग्दर्शक प्रशांत गिरकर यांनी सांगितले.
- सध्या मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे याठिकाणी या नाट काचे हाऊसफुल गर्दीत प्रयोग सुरु आहेत.
- तसेच कोकण दौरानंतर या नाटकाचा महाराष्ट्र दौरा सुरु होणार असल्याचे निर्माती नमिता गिरकर यांनी सांगितले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






