
मॉडर्न हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश.
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :-प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सो सायटीच्या मॉडर्न हायस्कूल,यमुनानगर,निगडी येथील वि द्यार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्य मिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
- शाळेच्या एकूण सहा विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

- इयत्ता पाचवीत सृष्टी सुजित कोठावळे हिने २२२ गुण मि ळवून राज्य गुणवत्ता यादीत ३६८ वा क्रमांक पटकावला.
- दर्शन यशवंत हारे २१४ उत्तेजनार्थ. इयत्ता आठवीत श्रेय स रवी कस्तुरे याने २६४ गुण मिळवून राज्यात २८ वा क्र मांक मिळवला.

- तसेच संस्कृती सतीश बंडगर (२४२ गुण, १४५ वा क्रमां क), तीर्थकृष्ण निलेश जगताप (२३४ गुण, २३५ वा क्रमां क), शुभम शेषनारायण लोकरे (२३२ गुण, २४८ वा क्रमां क) आणि विनीत विजय देसाई (२३० गुण, २७३ वा क्रमां क) यांनीही गुणवत्ता यादीत स्थान मिळवून प्रशालेचा गौ रव वाढविला.

- या यशासाठी विद्यार्थ्यांना आशा कुंजीर ,श्रीकृष्ण निकम, साधना राऊत,उमा बिर्जे,मनीषा बोत्रे,वृषाली सलगर,मीना अधिकारी,विभागप्रमुख अमोल नवलपुरे, मुख्याध्यापक प्रकाश पाबळे,राजीव कुटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
- तसेच विद्यार्थ्यांच्या यशात पालकांच्या सहकार्याचाही मह त्त्वाचा वाटा राहिला.

- विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या वंदना सोनो ने, पर्यवेक्षक विजय पाचरणे,शाळा समिती अध्यक्ष मान सिंग साळुंखे आणि व्हिजिटर प्रमोद शिंदे यांनी विद्यार्थ्यां चे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

- तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे, कार्यवा ह प्रा.शामकांत देशमुख,सहकार्यवाह प्रा.डॉ. ज्योत्स्ना एक बोटे,उपकार्यवाह नगरसेविका प्राचार्या प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे आणि उपकार्यवाह दीपक मराठे यांनी विद्यार्थी, पालक व संपूर्ण प्रशालेचे अभिनंदन करून पुढील वाटचा लीस शुभेच्छा दिल्या.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






