
मित्र गेले, नगरसेवक फुटले तरी डगमगणार नाही; जे चुकले त्यांना धडा शिकवणारच..! धाराशिवच्या पडझडीवर आमदार कैलास पाटील यांचा एल्गार.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- धाराशिव येथील काही मित्र सोडून गेले आणि काही नगरसेवक फुटले तरी मी मुळीच डगमगणार नाही. ज्यांनी पक्षाशी आणि जनते शी गद्दारी केली आहे, त्यांना येणाऱ्या निवडणुकीत जनता च धडा शिकवेल,” असा थेट आणि आक्रमक इशारा आम दार कैलास पाटील यांनी दिला आहे.
- धाराशिव नगरपालिकेतील राजकीय पडझड आणि पक्षां तराच्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
- गेल्या काही दिवसांत धाराशिवमधील अनेक प्रमुख आजी -माजी नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षांतर केल्या मुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

- या पडझडीवर आमदार कैलास पाटील यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे आपली भूमिका मांडली.
- कार्यकर्त्यांच्या बळावर पुन्हा उभे राहणारआमदार पाटील म्हणाले की, सत्ता आणि पदाच्या लालसेपोटी काही लोकां नी घाईगडबडीत निर्णय घेतले आहेत.
- परंतु, निष्ठावंत कार्यकर्ता आणि सामान्य जनता अजूनही माझ्यासोबत खंबीरपणे उभी आहे. नेत्यांच्या जाण्याने पक्ष संपत नसतो,तर नवीन नेतृत्वाला संधी मिळत असते.
- आपण जनतेच्या सुख-दुःखात नेहमी सोबत राहिलो आहो त, त्यामुळे अशा पडझडीने आपला आत्मविश्वास कमी होणार नाही.
- चुकलेल्यांना जनता धडा शिकवणार”ज्यांनी संकटकाळा त साथ सोडली, त्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे.
- राजकारणात चढ-उतार येत असतात, पण तत्त्व सोडाय ची नसतात. जे चुकले आहेत, त्यांना त्यांची जागा दाखवू न देण्याची ताकद धाराशिवच्या जनतेमध्ये आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नवीन आणि निष्ठावंत चेहऱ्यांना संधी देऊन पुन्हा एकदा ताकदी ने कमबॅक करणार असल्याचा निर्धारही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
- या सभेला तालुक्यातील हजारो कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
- आमदार पाटील यांच्या या आक्रमक पवि त्र्यामुळे धाराशि वमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, आ गामी काळात येथील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्या ची चिन्हे आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






