धाराशिवमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ४ चोरीच्या दुचाकींसह आरोपी गजाआड. 

  • प्रतिनिधी : परडा : फारूक शेख :- स्थानिक गुन्हे शाखे ने (LCB) धडक कारवाई करत ४ चोरीच्या मोटारसायक ली जप्त केल्या असून एका अट्टल चोराला ताब्यात घेतले आहे.
  • परमेश्वर उर्फ सुरेश चंदर काळे (वय ४०,रा.जुना बस डेपो जवळ, पारधी पिढी, धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
  • या कारवाईत १ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
  • गुप्त बातमीदारा कडून मिळाली माहितीपोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री.सचिन पांडकर यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यात पेट्रोलिंग करत होते.
  • दरम्यान, धाराशिव शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात ए क इसम चोरीची दुचाकी घेऊन थांबल्याची खात्रीशीर मा हिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली.
  • अशी केली कारवाईमाहिती मिळताच पथकाने तातडीने अण्णाभाऊ साठे चौकातून संशयित आरोपी परमेश्वर काळे याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.
  • मात्र, पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन कडक चौकशी केली असता, त्याने वेगवेगळ्या भागांतून दुचाकी चोरून लपवून ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीने दा खवलेल्या ठिकाणी छापा टाकून ४ मोटारसायकली जप्त केल्या.
  • वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून केल्या होत्या चो ऱ्यागुन्हे अभिलेखाची तपासणी केली असता, जप्त केले ल्या दुचाकी आनंदनगर (धाराशिव ग्रामीण), औसा (लातूर जिल्हा) आणि कर्जत (अहिल्यानगर/रायगड) पोलीस ठा ण्यांच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे उघड झाले आहे.
  • पोलिसांनी १,८५,००० रुपये किमतीच्या सर्व दुचाकी आ णि आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी आनंदनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
  • या पथकाने केली कामगिरीही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री.सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस अंमलदार समाधान वाघमारे, राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे, अमोल चव्हा ण, महिला पोलीस कर्मचारी शोभा बांगर, चालक पोलीस दहिहांडे आणि शेरखाने यांच्या पथकाने केली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles