
सैनिकांच्या त्यागाला राखीच्या स्नेहबंधाने मानवंदना; मॉडर्न हायस्कूलच्या स्काऊट-गाईड विद्यार्थिनींचे रक्षाबंधन.
- प्रतिनिधी : निगडी : शिवाजी अंबिके :-प्रोग्रेसिव्ह एज्यु केशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कूल, निगडी येथील स्का ऊट-गाईडच्या विद्यार्थिनींनी अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रा तील देशसेवेत जखमी होऊन अपंगत्व आलेल्या सैनिकां सोबत रक्षाबंधनाचा सण अत्यंत भावनिक आणि देशभ क्तीपूर्ण वातावरणात साजरा केला.

- देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढताना अनेक सैनिकांनी आपल्या आयुष्यातील सुखाचा त्याग केला. युद्धात अपंग त्व आलेल्या या शूर जवानांच्या भेटीने विद्यार्थिनींना देशसे वेचे खरे मोल अनुभवता आले.
- सैनिकांनी आपल्या सेवाकाळातील शौर्याच्या आणि संघ र्षाच्या प्रेरणादायी कथा विद्यार्थिनींना सांगितल्या. या कथा ऐकताना विद्यार्थिनी भारावून गेल्या.

- सैनिकांचे धैर्य, त्याग, जिद्द आणि देशाप्रती असलेली निष्ठा पाहून त्यांच्या मनात जवानांबद्दलचा आदर आणि कृतज्ञ ता अधिक दृढ झाली.
- रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी सैनिकांचे औक्षण करून त्यांच्या मनगटावर प्रेम, सन्मान आणि कृतज्ञतेचे प्रतीक असलेल्या राख्या बांधल्या.
- राखी बांधताना विद्यार्थिनी आणि सैनिक यांच्यात निर्माण झालेला स्नेहबंध अत्यंत भावनिक होता.

- सैनिकांनीही विद्यार्थिनींना आशीर्वाद देत देशप्रेम, शिस्त, धैर्य आणि जबाबदारीची भावना मनात कायम ठेवण्याचा संदेश दिला.
- यावेळी निगडी अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यांना देखील स्काऊट गाईडच्या मुलींनी राख्या बांधल्या.
- शालेय जीवनात विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यामध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, संवेदनशील ता, कृतज्ञता आणि राष्ट्रसेवेची भावना रुजविण्याच्या उद्दे शाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

- सैनिकांच्या प्रत्यक्ष भेटीतून विद्यार्थिनींना देशाच्या सुरक्षे साठी जवानांना करावा लागणारा त्याग आणि संघर्ष सम जून घेण्याची संधी मिळाली.
- त्यामुळे हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम विद्यार्थिनींसाठी एक अविस्मरणीय आणि प्रेरणादायी अनुभव ठरला.
- या उपक्रमास शाळेच्या प्राचार्या वंदना सोनोने,पर्यवेक्षक विजय पाचारणे स्काऊट गाईड शिक्षिका आशा कुंजीर,शि वाजी अंबिके उपस्थित होते.

- या उपक्रमाचे संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. डॉ.ज्यो त्स्ना एकबोटे, उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे,शाळा समिती अध्यक्ष प्रा.मानसिंग साळुंके,व्हिजिटर प्रमोद शिंदे आणि सदस्य राजीव कुटे यांनी कौतुक केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






