स्मार्ट कार्ड तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांची कोंडी; परिवहन मंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी;एकीकडे पावसाने व दडी मारली तर दूसरी कडे स्मार्ट कार्डमध्ये बॅलन्स न जाणे व अंगठाणा बसणे नागरिकना ला भुर्दंड सोसावा लागत आहे.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :- एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड प्रणालीतील तांत्रिक त्रुटींमुळे सध्या महिला आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
  • कार्डमध्ये तांत्रिक बिघाड असल्याच्या कारणावरून या प्र वाशांना थेट पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागत अस ल्याने, राज्याचे परिवहन मंत्री या गंभीर समस्येकडे लक्ष देणार का, असा सवाल आता प्रवासी वर्गातून उपस्थित केला जात आहे.
  • तसेच महामंडळाकडून प्रवाशांची एक प्रकारे पिळवणूक होत असल्याचा आरोपही होत आहे.एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्डमध्ये पैसे भरूनही (रिचार्ज) ते कार्डमध्ये वर्ग न होणे, तसेच नवीन कार्ड काढताना बायोमेट्रिक मशीनवर ज्येष्ठ नागरिकांचे अंगठे न मॅच होणे अशा अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
  • स्मार्ट कार्ड चालत नसल्याने किंवा मशीनमधील तांत्रिक बिघाडामुळे वाहकांकडून (कंडक्टर) प्रवाशांना थेट पूर्ण तिकीट देण्याची सक्ती केली जात आहे.
  • यामुळे सवलतीस पात्र असूनही केवळ प्रशासकीय त्रुटींमु ळे महिला आणि वृद्धांना त्यांच्या हक्काच्या सवलतीपासू न वंचित राहावे लागत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप आहे.
  • जोपर्यंत यंत्रणा सुधारत नाही, तोपर्यंत आधार कार्ड पाहून सवलत द्या!यावर तात्पुरता तोडगा म्हणून, जोपर्यंत स्मार्ट कार्डची तांत्रिक यंत्रणा पूर्णपणे सुरळीत होत नाही, तोपर्यं त महिलांचे आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे आधार कार्ड किंवा इतर अधिकृत ओळखपत्र पाहून वाहकांनी त्यांना अर्धे (हाफ) व मोफत तिकीट द्यावे, अशी आग्रही मागणी परंड्यातील प्रवाशांकडून केली जात आहे.
  • परिवहन विभागाने या गंभीर समस्येत तातडीने हस्तक्षेप करून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles