
मॉडर्न हायस्कूल इंग्रजी माध्यम शाळेत दहीहंडी उत्साहात संपन्न….!
- प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसा यटीच्या यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूल (इंग्र जी माध्यम) येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्या च्या पार्श्वभूमीवर दहीहंडीचा सण अत्यंत जल्लोषात आ णि उत्साहात साजरा करण्यात आला.
- भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांमागील सामाजिक मूल्यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने या विशे ष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

- रंगीबेरंगी आणि पारंपारिक पोषाखात सजून आलेले लहा न-मोठे विद्यार्थी या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले.
- ‘गोविंदा आला रे आला’ आणि ‘मच्छिंद्रा आला रे आला’ अशा गर्जनांनी आणि पारंपरिक संगीताच्या तालावर संपू र्ण परिसर दुमदुमून गेला होता.

- हंडी फुटताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजर करत विद्या र्थ्यांचे कौतुक केले. या सोहळ्यात विविध वर्गांतील मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
- शाळेच्या मुख्याध्यापिका गौरी सावंत यांनी या प्रसंगी वि द्यार्थ्यांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
- आपल्या संदेशात त्या म्हणाल्या, “दहीहंडी हा केवळ एक सण नसून तो एकता, संघभावना (Teamwork), आणि जिद्दीचे प्रतीक आहे.

- मानवी मनोरे रचताना एकमेकांवर दाखवलेला विश्वास आणि सहकार्य हेच गुण आयुष्यात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे असतात.
- अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते.”तसेच शिक्षिका निलम देसाई यांनी दहीहंडीची माहिती दिली.
- या सोहळ्यासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एक बोटे,कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख,सहकार्यवाह प्रा.डॉ. ज्योत्स्ना एकबोटे,शाळा समिती अध्यक्ष दीपक मराठे, व्हि जिटर प्रा.अतुल पाठक यांनी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






