पवार घराण्याची पहाटे दौऱ्याची परंपरा कायम; रोहित पवारांची खासापुरीत धाव.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- खासापुरी (ता. परं डा) : पवार घराण्याची पहाटे दौरे करण्याची आणि जनते च्या सुख-दुःखात थेट सहभागी होण्याची परंपरा आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली.
  • शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता खासापुरी येथे धाव घेत कै. प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
  • खासापुरी येथील प्रथमेश देशमुख हा पुणे येथे एम.पी. एस.सीची तयारी करणारा तरुण होता. काही दिवसांपूर्वी त्याचे निधन झाल्याने देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
  • या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी सकाळीच खासापुरी गाठत देशमुख कुटुंबीयांची भे ट घेतली.
  • यावेळी त्यांनी प्रथमेशच्या आईसह कुटुंबीय व नातेवाइकां शी संवाद साधून त्यांच्या दुःखात सहभागी होत धीर दिला.
  • संकटाच्या काळात देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी ठामप णे उभे राहण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच केव ळ सांत्वनापुरते न थांबता वैयक्तिक पातळीवर आर्थिक मदतही कुटुंबीयांकडे सुपूर्द केली.
  • ‘झोपलेल्या सरकारला उठवावे लागेल’
  • या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे.
  • तरुणांचे प्रश्न गंभीर आहेत, अनेक कुटुंबांवर संकटे येत आहेत; मात्र सरकार सुस्त आहे. या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आता तीव्र संघर्ष करावा लागेल आणि सरकारला उठवावेच लागेल.”
  • दरम्यान, रोहित पवार यांनी पहाटेच खासापुरी गाठून दुः खाच्या प्रसंगी कुटुंबीयांची भेट घेतल्याने त्यांच्या या संवेद नशील भूमिकेची तालुक्यात चर्चा होत आहे.
  • यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच खासापुरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles