भूम तालुक्याच्या मुख्य शासकीय आवारात स्वच्छतेचे तीन तेरा; उपविभागीय अधिकारी कार्यालया स्वच्छालय मध्ये दारूच्या बाटल्या आणि घाणीचे साम्राज्य….!

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-एकीकडे देशपातळी वर ‘मेरा भारत महान’ आणि ‘स्वच्छ भारत अभियान’ जो रात राबवले जात असल्याचा आव आणला जात असता ना, भूम येथील मुख्य शासकीय कार्यालयाच्या आवारात मात्र या अभियानाचा पुरता बुरखा फाटला आहे.
  • भूम येथील उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालया च्या आवारामध्ये सध्या घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरले असून, येथील स्वच्छतागृहांची (मूतारी) अत्यंत दुरवस्था झाली आहे.
  • धक्कादायक बाब म्हणजे, या शासकीय परिसरातील शौ चालयांमध्ये चक्क दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचे पाहायला मिळत आहे.
  • तालुक्याचे मुख्य प्रशासकीय केंद्र असलेल्या या ठिकाण च्या या विदारक स्थितीमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
  • भूम येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय हे तालुक्या चे मुख्य शासकीय केंद्र आहे.
  • दररोज तालुक्यातील शेकडो नागरिक आपल्या विविध प्रशासकीय, जमिनीच्या आणि इतर कामांसाठी या कार्या लयात येत असतात.
  • मात्र, कार्यालयाच्या आवारात पाऊल ठेवताच नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. येथील मूतारी आणि स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, त्यां ची नियमित स्वच्छता केली जात नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
  • सर्वात गंभीर बाब म्हणजे, या शासकीय कार्यालयाच्या स्वच्छतागृहांचा वापर आता मद्यपींचा अड्डा म्हणून होत असल्याचे चित्र आहे.
  • शौचालयांमध्ये जागोजागी दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. महिला व वृद्ध नागरिकांना या अस्वच्छतेमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
  • एकीकडे शासकीय अधिकारी जनतेला स्वच्छतेचे धडे देतात, तर दुसरीकडे त्यांच्याच कार्यालयाच्या नाकाखाली एवढी घाणी आणि अवैध प्रकार सुरू असल्याने ‘दिवाखा ली अंधार’ अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
  • तालुक्याचे मुख्य कार्यालय असूनही याकडे प्रशासनाचे इतके दुर्लक्ष का? या आवारातील स्वच्छतेकडे नक्की को ण लक्ष देणार? असा संतप्त सवाल आता भूम तालुक्या तील सुजाण नागरिक विचारत आहेत.
  • या गंभीर प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन ता त्काळ स्वच्छता करावी आणि शासकीय आवारात दारू च्या बाटल्या आणणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
  • आता याकडे प्रशासनाचे लक्ष कधी लागणार, याकडे संपू र्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles