
लांजा आरगाव येथे विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह.
- प्रतिनीधी : लांजा : प्रमोद तरळ :- तालुक्यातील आरगा व खालील वाडी येथील मयूर प्रकाश जाधव (वय २८) या तरुणाचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली.
- आजारपणाला कंटाळून त्याने विहिरीत उडी मारुन हे टो काचे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज वर्तव ला जात असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

- प्राप्त माहितीनुसार मयूर जाधव यांच्या कमरेखालील शरी राची संवेदनशीलता कमी झाल्याने त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालय तसेच पाली उपजिल्हा रुग्णालयात उप चार सुरू होते प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो मानसिक तणावा खाली होता.
- दरम्यान शुक्रवारी दुपारी तो घरात कोणालाही न सांगता निघून गेला होता.
- बराच वेळ तो परत आल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांनी त्याचा सर्वत्र शोध सुरु केला शोध मोहीमे दरम्यान वाडीती ल मनोहर खामकर यांच्या दगडी विहिरीत मयूरचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
- ग्रामस्थांनी त्याला तत्काळ बाहेरून काढून रुग्णवाहिकेतू न लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र रुग्णालया तील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दुपारी सव्वा दोनच्या सुमारास त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित कर ण्यात आले.
- या प्रकरणी विजय तुकाराम जाधव यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी भारतीय नाग रिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९४ नुसार आक स्मिक मृत्यूची (रजि.नं ५१/२०२६) नोंद केली आहे.

- घटनेचा जाहीर अहवाल कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे पा ठविण्यात आला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हेडकॉन्स्टेबल शेलार (ब.नं ४०९) या प्रक रणाचा पुढील तपास करत आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






