कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई या मातृसंघटनेचा  १०६ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न.

  • प्रतिनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :- कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई या आपल्या मातृ संघटनेचा १०६ वा वर्धापन दिन सोहळा गुरुवार,दिनांक १ ऑक्टोबर २०२६ रोजी सा यंकाळी ६.०० वाजता वाघे हॉल, कुणबी ज्ञाती गृह, परळ, मुंबई येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
  • या सोहळ्याचे अध्यक्षस्थान संघाध्यक्ष मा.श्री.अनिल नवग णे यांनी भूषविले.
  • समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्यासाठी सातत्यपूर्ण व अविरतपणे कार्यरत राहणारी संघटना, तसे च प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला उन्नतीकडे नेणारा नवा विचार आणि नवी दिशा देणारी संघटना म्हणजेच कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई होय.
  • या गौरवशाली वाटचालीचा साक्षीदार होण्यासाठी १०६ व्या वर्धापन दिन सोहळ्यास संघाचे उपाध्यक्ष शंकरराव म्हसकर, बबन उंडरे, एड.अवधूत पुरस्कार, सरचिटणीस कृष्णा वणे, सहचिटणीस माधव कांबळे, प्रमोद खेराडे, सं जय उमासरे, रवींद्र कुरतडकर, ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य मधुकर तोरस्कर,राजाभाऊ कातकर, सदानंद काष्टे, अरविं द डाफले, कुणबी बँक संचालक संतोष चौगुले, विवाह स ल्लागार मंडळाचे अध्यक्ष सुरेश घडवले,कुणबी युवा अध्य क्ष युवराज संतोष, जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्था जिल्हाध्यक्ष रत्नागिरी अँड. महेंद्र मांडवकर, कुणबी युवा मुंबईचे सरचिटणीस सचिन रामाणे, उपाध्यक्ष मिलिंद चिंब डे, अँड.महेश अंबावले, सहचिटणीस पंकज पालकर, बार कू बेंडल, खजिनदार पांडुरंग दोडेकर, महिला मंडळ उपा ध्यक्ष स्मिता गोंधळी यांच्यासह तालुका शाखांचे अध्यक्ष, सरचिटणीस, पदाधिकारी, युवक मंडळाचे अध्यक्ष, सरचि टणीस, पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने समाज बांधव-भगिनी उपस्थित होते.
  • यावेळी विविध तालुका शाखांच्या पदाधिकाऱ्यांनी १०६ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत संघटनेच्या आजवर च्या कार्याचा गौरव केला.
  • तसेच संघटनेची भविष्यातील वाटचाल, समाजासमोरील आव्हाने आणि समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी करावया च्या कार्याबाबत आपले मनोगत व्यक्त केले.
  • याप्रसंगी मंचावरील मान्यवरांनी कुणबी समाजोन्नती संघा चा गौरवशाली इतिहास, समाजासाठी संघटनेने सातत्याने केलेली लढाई आणि सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक, आर्थिक तसेच राजकीय उन्नतीसाठी केलेले विविध प्रयत्न यावर सविस्तर विचार मांडले.
  • अध्यक्षीय भाषणात संघाध्यक्ष मा.श्री.अनिल नवगणे यां नी सांगितले की, “मी तरुण असून मला कुणबी समाजोन्न ती संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपण सर्वांनी दि ली, त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे.”
  • येणाऱ्या काळात संघटनेचे विचार आणि संघटन गावपात ळीपर्यंत पोहोचविण्यासाठी, तसेच समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सर्व स्तरांवर सातत्याने प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
  • १०६ वर्षांची ही गौरवशाली परंपरा पुढे नेत संघटन,प्रबोध न आणि सामाजिक उन्नतीचा विचार अधिक व्यापक कर ण्याचा संकल्प या वर्धापन दिन सोहळ्यात व्यक्त करण्या त आला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles