
मॉडर्न हायस्कूलमध्ये पालखी सोहळा उत्साहात साजरा.
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :-यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये उत्साहपूर्ण व भक्तीमय वातावरणात पालखी सोहळा संपन्न झाला.

- यावेळी विठ्ठल रुक्मिणी,भगवी पताका घेतलेले वारकरी, डोक्यावर तुळशी घेतलेल्या मुली,गळ्यात पखवाज,हातात टाळ घेतलेले विद्यार्थी पालखीत सहभागी झाले होते.

- त्यामुळे अवघे वातावरण भक्तीमुळे झाले होते. विठ्ठल आ णि ज्ञानोबा माऊलीच्या गजरात मुलांनी पालखी सोहळ्या चा आनंद लुटला.

- यावेळी साधना राऊत यांनी वारीची परंपरा कशी चालू झाली याची माहिती दिली.

- प्राचार्य शारदा साबळे, पर्यवेक्षक विजय पाचारणे, सांस्कृ तिक विभागप्रमुख जयश्री चव्हाण,अमृता गायकवाड,उमा बिर्जे,गंगाधर सोनवणे यांनी नियोजन केले.

- या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन ए कबोटे, कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख,सहकार्यवाह प्रा. डॉ.ज्योत्स्ना एकबोटे,उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदिता एकबो टे,शाळा समिती अध्यक्ष प्रा.मानसिंग साळुंखे,व्हिजिटर प्रमोद शिंदे,राजीव कुटे यांनी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











