आलेश्वर येथे बुधवारी भव्य मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन जास्तीत जास्त सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा : फारूक मूलानी. 

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- ‘चला निरोगी धारा शिव घडवूया’ या संकल्पनेतून आणि जनसेवेचा वारसा जपत, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा स्पे शालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (नेरूळ, नवी मुंबई) यांच्या वतीने बुधवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
  • हे शिबीर सकाळी ९.०० ते दुपारी ५.०० या वेळेत ग्रामपं चायत कार्यालय, आलेश्वर (ता. परंडा, जि. धाराशिव) येथे पार पडणार आहे.
  • या शिबिरात नेरूळ (नवी मुंबई) येथील नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत रुग्णांची मोफत तपासणी करून आवश्य क औषधोपचार केले जाणार आहेत.
  • यामध्ये प्रामुख्याने हृदयविकार, नेत्ररोग, बालरोग, स्त्रीरोग, त्वचारोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग आणि पोटाच्या विकारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार व मार्गदर्शन केले जाईल.
  • मोफत शस्त्रक्रियेची सुविधा:
  • तपासणीदरम्यान ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासेल, अशा रुग्णांवर नेरूळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये पूर्णपणे मोफत शस्त्रक्रि या करण्यात येणार आहेत.
  • तसेच, ज्या रुग्णांचे उपचार किंवा शस्त्रक्रिया तेरणा हॉस्पि टलमध्ये करणे शक्य होणार नाही, त्यांच्यावर मुंबईतील जे. जे. (J.J.) आणि के.ई.एम. (KEM) सारख्या नामां कित रुग्णालयांत पुढील उपचार व शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था ट्रस्टमार्फत केली जाणार आहे.
  • आवश्यक कागदपत्रे:
  • शिबिराचा लाभ घेण्यासाठी येताना नागरिकांनी आपल्या सोबत रेशन कार्ड, आधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड आणि पॅन कार्ड ही मूळ (ओरिजनल) कागदपत्रे आणणे अनिवार्य आहे.
  • परिसरातील गरजू रुग्णांनी आणि नागरिकांनी या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन फारूक मुलानी यांच्या वतीने वतीने करण्यात आले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles